दिल्लीत Toothpaste ची चोरी केली, पोलिसांनी थेट युपी मध्ये येऊन चोराला पकडले

विशेष म्हणजे पोलिसांनीही चोराचा पाठलाग सुरू केला आणि अखेर दुसऱ्या राज्यात जाऊन त्याला पकडले.

दिल्लीत Toothpaste ची चोरी केली, पोलिसांनी थेट युपी मध्ये येऊन चोराला पकडले
toothpaste
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 26, 2022 | 4:55 PM

चोरीच्या घटना अनेकदा ऐकायला मिळतात. भारतातच नव्हे तर जगभरातून अशा अनेक घटना समोर येत असतात, त्यातील काही अशा काही घटनाही समोर येतात, ज्याबद्दल जाणून खूप आश्चर्य वाटतं. वाहने, दागिने अशा महागड्या वस्तू चोरीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील, पण चोराने टूथपेस्ट चोरून पळ काढल्याचे कधी ऐकले आहे का? विशेष म्हणजे पोलिसांनीही चोराचा पाठलाग सुरू केला आणि अखेर दुसऱ्या राज्यात जाऊन त्याला पकडले. हे प्रकरण तुम्हाला खूप विचित्र वाटेल. कदाचित तुमचा त्यावर विश्वासही बसणार नाही, पण ही घटना अगदी खरी आहे.

खरं तर हे सगळं प्रकरण असं आहे की, एका चोरट्याने दिल्लीहून टूथपेस्टचे 200 हून अधिक बॉक्स चोरले आणि यूपीतील बहराइच जिल्ह्यातील आपल्या गावी पळ काढला. मग काय, पोलीसही त्याच्या मागोमाग त्याच्या गावी गेले आणि अखेर त्या चोराला अटक केली.

मीडिया रिपोर्टनुसार, हरस्वरुप सिंह यांचा मुलगा कुंवर पाल सिंह याने 22 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाहोरी गेट पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

या चोरीमुळे 11 लाख रुपये किमतीचे 215 बॉक्स टूथपेस्ट चोरल्याचे सांगण्यात आले. उदलकुमार उर्फ संतोष असे आरोपीचे नाव आहे.

त्याचवेळी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान, पोलिसांना अशी माहिती मिळाली की आरोपी त्याच्या गावात लपला आहे, जो बहराईच जिल्ह्यातील जारवाल रोड पोलिस स्टेशन परिसरात आहे, ज्याचे नाव खासेपूर बेहरामपूर आहे.

आता ही माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरावर छापा टाकला.

रिपोर्ट्सनुसार, कोणाला कळू नये म्हणून आरोपींनी टूथपेस्टच्या पेट्या प्लास्टिकच्या चादरींनी झाकून ठेवल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, अखेर चोरट्याला पोलिसांनी पकडले