जगातली अनोखी जागा जिथे सूर्य 4 महिने मावळत नाही; मग मुलीला का ठेवावी लागते बंदूक सतत जवळ?

Cecilia Blomdahl : तर पृथ्वीच्या पाठीवर अनेक खास जागा आहेत. आता नॉर्वे हा देशच घ्या ना. येथील एका भागात सूर्य 4 महिने ठाण मांडून असतो. तो मावळतच नाही. पण तरीही येथील रहिवाशांना एक बंदूक स्वतःजवळ बाळगावीच लागते. कारण तरी काय?

जगातली अनोखी जागा जिथे सूर्य 4 महिने मावळत नाही; मग मुलीला का ठेवावी लागते बंदूक सतत जवळ?
सूर्य मावळत नाही
| Updated on: Aug 07, 2025 | 1:37 PM

जगाच्या पाठीवर अनेक प्रदेशात निसर्ग सौंदर्याची उधळण करतो. अनेक भागात नैसर्गिक चमत्कार दिसून येतात. नॉर्वे देशातील स्वालबार्ड हा असाच भाग. या भागात सूर्य चार चार महिने ठाण मांडून असतो. तो कधी मावळत नाही. येथे सूर्य कायम तळपत असतो. तो रोज उगवत नाही की मावळत नाही. पण तरीही या भागातील रहिवाशांना एक बंदूक जवळ बाळगावी लागते.

नॉर्वेच्या उत्तरी भाग हा बर्फाच्छादीत आहे. त्याला स्वालबार्ड असे म्हणतात. येथे सोशल मीडियावर सक्रीय असलेले कंटेंट क्रिएटर सेसिलिया ब्लोमडाल (Cecilia Blomdahl) एकदम हटके जीवन जगते. ती युट्यूब आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून येथील जीवन जगासमोर आणते. येथील नैसर्गिक घडामोडी जगासमोर तिने आणल्या. त्यात तिने एक धक्कादायक प्रकार समोर आणला. तिच्या मते, येथे चार महिने सूर्य माळवत नसला तरी तिला बाहेर पडताना कायम बंदूक सोबत ठेवावी लागते. इतकेच काय 9-10 वर्षांची मुलं एकतर बाहेर एकटी जात नाही, गेलीच तर त्यांच्याजवळ बंदूक असते.

का ठेवावी लागते बंदूक

सेसिलियानुसार, स्वालबोर्डमध्ये पोलर बिअर, हिमप्रदेशातील अस्वलाचा मुक्त संचार आहे. ते केव्हा घरात घुसेल आणि हल्ला करेल हे सांगताच येत नाही. तो मानवी वस्तीजवळ दिसतोच. त्यामुळे लोक कायम सतर्क राहतात. त्यांना आत्म सुरक्षेसाठी बंदुकीचा वापर करावा लागतो. तिने सांगितले की, गेल्या 9 वर्षांपासून ती या भागात राहत आहे, पण तिला अद्याप बंदुकीचा वापर करावा लागला नाही. पण बाहेर पडताना, जंगलात सफारी करताना बंदूक सोबत नेण्याची इथली प्रथा ती सुद्धा पाळते. कारण संकट सांगून येत नाही.

मोठा आवाज आणि आग ओकणाऱ्या बंदुकाचा वापर केल्यावर अस्वल घाबरून पळ काढतात. स्वालबार्डची राजधानी लॉन्गइयरब्येनमध्ये (Longyearbyen) बंदूक घेऊन जाण्यास मनाई आहे. खासकरून सार्वजनिक ठिकाणे आणि दुकानात तुम्हाला बंदूक सोबत घेऊन जाता येत नाही. स्वालबोर्ड गव्हर्नरने 2024 मध्ये बंदुक परवाना घेणे आवश्यक नसल्याचे सांगितले. आत्मसंरक्षणासाठी बंदुकीचा वापर करता येतो.