
सोशल मीडियावर रोज लाखो फोटो व्हायरल होत असले तरी त्यातले काही फोटो असे आहेत जे लोकांच्या मनाला चटका लावून जातात. अशा प्रतिमांना ऑप्टिकल भ्रम असे म्हणतात. खरं तर, लोकांना या चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधण्याचे आव्हान दिले जाते. सध्या सोशल मीडियावरील असंच एक ऑप्टिकल इल्युजन लोकांमध्ये चर्चेचा विषय बनून राहिला आहे. ज्यात एक घुबड लपून कुठेतरी बसलेलं असतं. पण त्याला शोधून काढणं हे प्रत्येकाचं काम असतंच असं नाही. याच कारणामुळे हा फोटो पाहून अनेकांचा गोंधळ उडालाय.
ऑप्टिकल भ्रम असलेले हे चित्रही असे आहे की, त्यातील छुपे घुबड फार कमी लोकांना दिसते. जर तुमची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण असेल, तर तुम्हाला फोटोत लपलेले घुबड नक्कीच दिसेल.
खरंतर ज्या कलाकाराने हे चित्र तयार केलं आहे, त्याने घुबड अशा ठिकाणी लपवलं आहे की, ते झाडाच्या रंगसंगतीशी तंतोतंत जुळतंय.
म्हणून घुबड दिसणं ही एक मोठी गोष्ट आहे. अनेकांना वाटेल की त्यांची चेष्टा केली जात आहे, पण चित्रातील घुबड खरोखरच लपून बसले आहे.
जर तुम्हाला लपलेले घुबड सापडले असेल, तर नक्कीच गरुडासारखेच डोळे तुमच्याकडे आहेत. त्याचबरोबर घुबड अजून सापडले नसेल तर या चित्राकडे नीट बघा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
Here is the owl
घुबड शोधण्यात अपयशी ठरलेल्यांनी काळजी करण्याची गरज नाही. जंगलात घुबड आहे की नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी आम्ही त्याला पांढऱ्या वर्तुळात दाखवलंय.