कोडे! या चित्रात माणसाचा चेहरा लपलाय, दिसला?
कोड्याचं उत्तर देणं तर आपल्याला लहानपणापासून जमतं पण आधी ही कोडी आपण तोंडी सोडवायचो. आता ही कोडी आपण ऑनलाइन सोडवतो. ऑनलाइन प्रकारात अनेक प्रकारचे कोडे पाहायला मिळतात. आता ही कोडीच असतात त्यामुळे अर्थातच ती किचकट असतात. पण निरीक्षण कौशल्य चांगलं असल्यास उत्तर लवकर मिळतं.

मुंबई: ऑप्टिकल इल्युजनचे अनेक प्रकार असतात. अनेक अभ्यासकांच्या मते ऑप्टिकल इल्युजनमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला कळून येतं. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच ऑप्टिकल भ्रम. या चित्रात कधी तुम्हाला काहीतरी लपलेलं शोधायचं असतं तर कधी तुम्हाला यातील चुका शोधायच्या असतात. कधी तर दोन चित्रांमधील फरक सुद्धा शोधायचा असतो. ऑप्टिकल इल्युजन तेव्हाच सोडवता येऊ शकतं जेव्हा तुमचं निरीक्षण चांगलं असतं. कोड्याचं उत्तर द्यायला ते कोडं नीट निरखून बघा तुम्हाला नक्कीच याचं उत्तर सापडेल. ही कोडी खूप किचकट असतात.
ऑप्टिकल भ्रम माणसाला गोंधळून टाकतात
आता हे चित्र बघा. तुम्हाला वाटेल हे चित्र जसं दिसतंय तसंच आहे. पण मित्रांनो, या चित्रात काहीतरी लपलेलं आहे. या चित्रात जी म्हैस आहे आपल्याला तिचा मालक शोधायचा आहे. यात मालक सुद्धा लपलेला आहे. जे आपल्याला दिसतं तेच असतं असं नसतं बरेचदा यात वास्तव काहीतरी वेगळंच असतं. वास्तव वेगळं असल्यानेच याला ऑप्टिकल भ्रम असं म्हटलं जातं. ऑप्टिकल भ्रम माणसाला गोंधळून टाकतात, म्हणूनच याला भ्रम असं म्हटलं जातं.
उत्तर खाली दाखवून देत आहोत
तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुमचं निरीक्षण खूप चांगलं असायला हवं. नीट निरखून पाहिल्यावर याचं उत्तर दिसेल. हे चित्र उभंअसताना जर याचं उत्तर सापडत नसेल, तर ते आडवं करून बघा, उलट करून बघा. वेगवेगळ्या बाजूंनी हा फोटो बघा कदाचित तुम्हाला याचं उत्तर दिसेल. बरं तुम्हाला यात माणसाचा चेहरा दिसतोय का? हीच हिंट आहे. यात या म्हशीच्या मालकाचा चेहरा दिसतोय. दिसला? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर आम्ही तुम्हाला याचं उत्तर खाली दाखवून देत आहोत.

here is the face
