तुम्ही सुपर जीनियस! जर दिलेल्या वेळेत कोडं सोडवून दाखलंत तर
आता आव्हान हे आहे की जर तुम्हाला 15 सेकंदात लपलेले घुबड सापडले तर समजून घ्या की तुमची दृष्टीदेखील गरुडाइतकीच तीक्ष्ण आहे.

सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये ऑप्टिकल भ्रम अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. आपल्या मेंदू आणि निरीक्षण क्षमतेची चाचणी घेण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. यात आपल्या निरीक्षण कौशल्याची क्षमता देखील सुधारली जाते. लपलेले चेहरे शोधण्यापासून ते वेगवेगळे आकार आणि वस्तू पाहण्यापर्यंत अनेक प्रकारचे ऑप्टिकल भ्रम असतात. हे अवघड आणि आकर्षक असल्याने नेटिझन्सना ते सोडवण्यात तितकाच आनंद मिळतो. लहानपणी आपण कोडी सोडवायचो आता ऑनलाईन जगात ऑप्टिकल इल्युजन लोकप्रिय आहे.
आता सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांचा प्रचंड गोंधळ उडाला आहे. खरं तर एका झाडावर घुबड बसलेलं असतं. पण सर्व प्रयत्न करूनही ते नेटिझन्सना दिसत नाही.
आता आव्हान हे आहे की जर तुम्हाला 15 सेकंदात लपलेले घुबड सापडले तर समजून घ्या की तुमची दृष्टीदेखील गरुडाइतकीच तीक्ष्ण आहे. तसे हे घुबड जिथे बसले आहे ती जागा शोधणे हा लहान मुलांचा खेळ नाही.
मध्य प्रदेशातील पेंच राष्ट्रीय उद्यानात चेन्नईयेथील हौशी फोटोग्राफर वरुण जैन यांनी हा फोटो काढला आहे. आता चित्रात घुबड कुठे बसले आहे हे तुम्हाला सांगायचं आहे.
जर तुमचे निरीक्षण कौशल्य उत्तम असेल तर तुम्हाला 6 सेकंदात घुबड सापडेल. मात्र अनेकांना हा पक्षी प्रथमदर्शनी दिसणार नाही. त्यामुळे हे चित्र अतिशय काळजीपूर्वक पहा.
घुबड आणि झाडाच्या सालीचा रंग जवळजवळ सारखाच असतो. दिलेल्या वेळेत जर तुम्ही हा ऑप्टिकल भ्रम सोडवून दाखवलंत तर तुम्ही सुपर जीनियस आहात. खाली आम्ही तुमच्यासाठी एक फोटो दाखवत आहोत आहोत ज्यात आम्ही तुम्हाला उत्तर सांगतोय.

Here is the owl
