Viral photo : ‘या’ फोटोत तुम्हाला गाढव दिसतंय का? मग डोक्याला अजून ताण देण्याची गरज; JK Rowlingही confused

| Updated on: Mar 22, 2022 | 1:49 PM

Optical Illusion : सध्या सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स व्हायरल (Viral) होत आहेत. एक चित्र सध्या लोकांना विचार करायला लावत आहे. प्रथमदर्शनी लोकांचे उत्तर जवळपास एकसारखेच होते, पण प्रत्यक्षात वेगळेच आहे.

Viral photo : या फोटोत तुम्हाला गाढव दिसतंय का? मग डोक्याला अजून ताण देण्याची गरज; JK Rowlingही confused
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं Optical Illusion picture
Image Credit source: Twitter
Follow us on

Optical Illusion : ओळखा पाहू या सेक्शनमध्ये आपण अनेक फोटो, व्हिडिओ पाहत असतो. कधी कधी आपला अंदाज बरोबर येतो, तर कधी तो चुकतो. इंटरनेटवर व्हायरल होणारी ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स (Optical Illusion) अनेकदा यूझर्सना दोन भागात विभागतात. सध्या सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्मवर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स व्हायरल (Viral) होत आहेत. लोक त्यांच्या बुद्धीचा वापर करून उत्तर देतात. असेच आणखी एक चित्र सध्या लोकांना विचार करायला लावत आहे. प्रथमदर्शनी लोकांचे उत्तर जवळपास एकसारखेच होते, पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळेच असल्याचा दावा केला जात आहे. लोकांना ऑप्टिकल इल्युजनने चित्रे सोडवण्यात मजा येते. मनोरंजक चित्रे आपल्याला गोंधळात टाकतात. आमच्याकडे एक असे ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स आहे, जे तुम्हाला सांगू शकते की तुम्ही डाव्या मेंदूचे आहात की उजव्या मेंदूचे.

जे. के. रोलिंग यांनाही भुरळ

ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्सने हॅरी पॉटर लेखक जे. के. रोलिंग यांनासुद्धा भुरळ घातली आहे. त्यांनी हे छायाचित्र चाहत्यांसह ट्विटरवर शेअर केले. जेके रोलिंग यांनी प्रत्यक्षात काय पाहिले हे उघड केले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक गोंधळले. फोटोवर लिहिलेले दिसेल, की तुमचा मेंदू उजवा असल्यास, तुम्हाला एक मासा दिसेल जर तुम्ही डाव्या विचाराचे असाल तर तुम्हाला जलपरी दिसेल.

मासाही नाही अन् जलपरीही नाही…

काही यूझर्सनी लिहिले, की त्यांनी एक मासा पाहिला. इतरांनी सांगितले, की त्यांनी फोटोत जलपरी पाहिली. इंटरनेटवरच्या काहीजणांना तर मासाही दिसला नाही आणि जलपरीही दिसली नाही, तर चित्रात एक गाढव दिसले. हॅरी पॉटर लेखिका जे. के. रोलिंग यांनीही हेच पाहिले. हा फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे गाढव आहे, बहुधा.’ असाच एक फोटो शेअर करताना एका यूझरने त्याला सील म्हटले आहे. त्याचबरोबर काहींनी त्याला आपले पाळीव प्राणी म्हटले.

आणखी वाचा :

‘हे’ तर रिअल लाइफमधले tom & jerry! मांजरीला पाहून उंदीर काठीच्या टोकावर..! Funny video viral

Viral : भल्यामोठ्या अजगराच्या अंगावर बसून खेळतोय चिमुकला, Video काढणाऱ्यावर संतापले लोक

शंकरपाळ्या आणि कारल्यानंतर आता राज्यभर गाजतंय ‘या’ दोघांचं भांडण, Beedमधला Video viral