Video | उद्घाटन करताना कात्री खराब झाली, शेवटी दाताने फीत कापण्याची वेळ, पाकिस्तानी मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये एका मंत्र्याची उद्घाटन समारंभादरम्यान चांगलीच फजिती उडाली आहे. कात्री खराब असल्यामुळे शेवटी या मंत्र्याला थेट दाताने उद्घाटन समारंभ पार पाडावा लागलाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | उद्घाटन करताना कात्री खराब झाली, शेवटी दाताने फीत कापण्याची वेळ, पाकिस्तानी मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल
PAKISTANI MINISTER VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 9:00 PM

मुंबई : पाकिस्तानी लोकांचे असे अनेक कारनामे आहेत, ज्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही. पाकिस्तानी लोकांचे काही काही व्हिडीओ तर आजही यूट्यूब तसेच फेसबूकवर आवडीने पाहिले जातात. या देशातील नागरिक कधी काय करतील हे सांगता येत नाही. सध्या तर एक चांगलाच मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मंत्र्याची उद्घाटन समारंभादरम्यान चांगलीच फजिती उडाली आहे. कात्री खराब असल्यामुळे शेवटी या मंत्र्याला थेट दाताने उद्घाटन समारंभ पार पाडावा लागलाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (pakistani minister inaugurates shop ribbon with his teeth funny video went viral on social media)

उद्घाटन करताना कात्री झाली निकामी 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाकिस्तानमधील एका मंत्र्याचा आहे. हा मंत्री एका शोरुमचे उद्घाटन करण्यासाठी गेला आहे. या ठिकाणी दुकानाचे उद्घाटन करण्यासाठी एक फीत लावण्यात आलीय. ही फीत कापून पाकिस्तानचा मंत्री व्हिडीओतील शोरुमचं उद्घाटन करणार होता. मात्र, यावेळी मंत्र्याची चांगलीच पंचाईत झाली. या मंत्र्याला देण्यात आलेली कात्री ऐनवेळी खराब झालीय.

वैतागून मंत्र्याने आपल्या दातांनी फीत कापली

व्हिडीओमध्ये मंत्री फीत कापण्यासाठी कात्री घेऊन पुढे सरसावला आहे. मात्र, कात्री खराब असल्यामुळे मंत्र्याला ही फीत नीट कापता येत नाहीये. प्रयत्न करुनही ते शक्य होत नाहीये. शेवटी वैतागून मंत्र्याने आपल्या दातांनी ही फीत कापली आहे. दातांनी फीत कापून पाकिस्तानी मंत्र्याने शोरुमध्ये थाटात प्रवेश केलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. लोक हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी तर या व्हिडीओला उत्स्फूर्तपणे शेअर केले आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

इतर बातम्या :

सिद्धार्थच्या निधनानंतर चाहत्यांवर शोककळा, #sidnazz हॅशटॅगखाली शहनाजसोबतचे व्हिडीओ व्हायरल

Video | कुत्रा निघाला बाजा राला, बास्केट घेऊन केली फळांची खरेदी, खास व्हिडीओ पाहाच

Video | सिद्धार्थचा जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणतो “आयुष्य खूप मोठं आहे, पुन्हा भेटू”, चाहते भावूक

(pakistani minister inaugurates shop ribbon with his teeth funny video went viral on social media)