AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : घातक चित्त्यानं केला कुत्र्यावर हल्ला, पण… नंतरचा Video पाहून थक्क व्हाल

सोशल मीडिया(Social Media)वर एक अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ (Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कुत्र्याने असे काही केले आहे, की तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Viral : घातक चित्त्यानं केला कुत्र्यावर हल्ला, पण... नंतरचा Video पाहून थक्क व्हाल
चित्त्याचा कुत्र्यावर हल्ला
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jan 19, 2022 | 11:26 AM
Share

आश्चर्यकारक चपळता असलेले अनेक प्राणी आहेत. मात्र सर्वात वरच्या स्थानी आहे चित्ता(Panther)… चित्त्यासारखी अद्भूत चपळता क्वचितच कोणत्याही प्राण्यात दिसते. त्यामुळेच या क्रूर शिकाऱ्याला कोणी बळी पडलं तर त्याचा अंत निश्चित आहे… मात्र सध्या सोशल मीडिया(Social Media)वर एक अतिशय आश्चर्यकारक व्हिडिओ (Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कुत्र्याने असे काही केले आहे, की तुम्हाला आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये चित्त्याने कुत्र्यावर हल्ला केला आहे. आता तुम्हालाही वाटेल की जंगलातील सर्वात भयानक शिकाऱ्याशी लढणारा हा कुत्रा काय करतो? चला व्हिडिओमध्ये पाहू या काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

कुत्र्याने केला धैर्याने सामना

आता या कुत्र्याची इंटरनेट जगतात खूप चर्चा होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक चित्ता जंगलातून भटकत रहिवासी परिसरात शिरल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो एका कुत्र्याला आपला शिकार बनवण्याचा प्रयत्न करतो. पण यादरम्यान कुत्रा जे काही करताना दिसतो, त्याचे तुम्हालाही कौतुक वाटेल. स्वतःपेक्षा कितीतरी पटीने धोकादायक असलेल्या प्राण्याला तो ज्या पद्धतीने हाताळतो, ते कौतुकास्पद आहे. मात्र, व्हिडिओमध्ये कोणी कोणाचे तोंड पकडले आहे, हे कळू शकलेले नाही. पण असे असूनही कुत्रा चित्त्यासमोर हार मानत नाही. अखेर चित्ता तिथून निसटतो.

View this post on Instagram

A post shared by طبیعت (@nature27_12)

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर nature27_12 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 12 जानेवारी रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 4 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही यूझर्सनी कुत्र्याबद्दल चिंता व्यक्त केली, तर काहींचे म्हणणे आहे, की या कुत्र्याने चित्त्याचा धैर्याने सामना केला. कुत्रा आणि चित्त्याचा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीवरही काही यूझर्स संतापले आहेत.

Tallest rideable bicycle : अशी बनवली सायकल, की जिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली दखल!

Video : अंडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला मोरानं शिकवला चांगलाच धडा, झडप घातली आणि…

Viral : स्विमिंग पूलमधून प्लॅस्टिक काढताना दिसला हंस; Video पाहून यूझर्स म्हणाले, माणसापेक्षा जास्त हुशार!

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...