Video | नवरा-बायको खात होते आईसक्रीम, मध्येच मुलं आले, नंतर बायकोने काय केलं एकदा पाहाच !

या व्हिडीओमध्ये आपल्या मुलाने आईसक्रीमचा हट्ट धरु नये म्हणून पालकांनी घेतलेली मेहनत आणि त्यांची उडालेली फजिती पाहण्यासारखी आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

Video | नवरा-बायको खात होते आईसक्रीम, मध्येच मुलं आले, नंतर बायकोने काय केलं एकदा पाहाच !
icecream viral video
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 8:55 AM

मुंबई : आपल्या मुलांना वाईट सवयी लागू नयेत म्हणून पालक अतोनात मेहनत घेतात. मुलाला टीव्ही पाहण्याची सवय लागू नये म्हणून पालकसुद्धा ती पाहण्याचे टाळतात. तर काही पालक आपल्या मुलाला गोड, आंबट पदार्थ खाण्याची सवय लागू नये म्हणून आपल्या जिभेला मुरड घालताना दिसतात. सध्या अशाच एका पालकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्या मुलाने आईसक्रीमचा हट्ट धरु नये म्हणून पालकांनी घेतलेली मेहनत आणि त्यांची उडालेली फजिती पाहण्यासारखी आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. (parents hiding ice cream from their children video went viral on social media)

पती-पत्नी आरामात आईसक्रीम खात आहेत

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पती-पत्नी आरामात आईसक्रीम खाताना दिसत आहेत. थंडगार आईसक्रीम खाण्यासाठी दोघंसुद्धा निवांत बसले आहेत. त्यांनी आईसक्रीम खाण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ऐनवेळी त्यांची मुलं मध्ये आली आहेत. मुलं समोर आल्याचे दिसताच दोघे नवरा-बायको गोंधळले आहेत. त्यांनी लगेच आईसक्रीम खाणे बंद केले आहे.

महिलेने आईसक्रीम पतीच्या  टी-शर्टमध्ये टाकली

विशेष म्हणजे मूल आपल्याकडे येत असल्याचे दिसताच व्हिडीओतील महिलेने ती खात असलेली आईसक्रीम आपल्या पतीच्या टी-शर्टमध्ये टाकून दिली आहे. तसेच पती खात असलेली आईसक्रीमसुद्धा महिलेने हिसकावली आहे. आपल्या पतीची आईसक्रीमसुद्धा या महिलेने त्याच्याच टी-शर्टमध्ये टाकली आहे. शर्टमध्ये टाकलेल्या दोन्ही आईसक्रीम पोटाला थंड लागत असल्यामुळे व्हिडीओतील माणूस चांगलाच गोंधळला आहे. त्याला काय करावे हे सूचत नाहीये. तो जागेवरच चुळबूळ करतोय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व मजेदार प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खूश झाले आहेत. लोक या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. तसेच त्याला लाईक आणि शेअरसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | ना घोडा ना वाजंत्री, पठ्ठ्या मित्रांच्या खांद्यावर बसून आला, नवरदेवाची खास एन्ट्री एकदा पाहाच !

Video | नातवाने प्रॉपर्टी मागितली, आजी म्हणते प्रेम पाहिजे की पैसा, मजेदार भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

Video | “आमच्या घरातलं मीठ संपलंय वं…लै म्हंजी लै कट्टाळा आलाय” मराठमोळ्या चिमुकलीचं गोड बोलणं एकदा पाहाच

(parents hiding ice cream from their children video went viral on social media)