Video | “आमच्या घरातलं मीठ संपलंय वं…लै म्हंजी लै कट्टाळा आलाय” मराठमोळ्या चिमुकलीचं गोड बोलणं एकदा पाहाच

व्हिडीओतील गोड मुलगी लग्न झालेल्या बायकांसारखी साडी घालून बसली आहे. तिचे संवाद आणि हावभाव वयस्कर महिलांसारखेच आहेत. तिचा हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल.

Video | आमच्या घरातलं मीठ संपलंय वं...लै म्हंजी लै कट्टाळा आलाय मराठमोळ्या चिमुकलीचं गोड बोलणं एकदा पाहाच
marathi small girl viral video-compressed
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 8:24 AM

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या एका मराठमोळ्या चिमुकलीचा एक मजेदार व्हिडीओ चर्चेत आला आहे. व्हिडीओतील गोड मुलगी लग्न झालेल्या बायकांसारखी साडी घालून बसली आहे. तिचे संवाद आणि हावभाव एखाद्या महिलेसारखेच आहेत. तिचा हा व्हिडीओ पाहून तुमचा मूड नक्कीच फ्रेश होईल. (marathi small girl behaving like women talking in very funny manner see viral video)

मराठमोळी छोटी मुलगी साडी घालून बसली

व्हिडीओमध्ये एक मराठमोळी छोटी मुलगी साडी घालून बसली आहे. एखादी महिला काम करुन थकल्यावर जशी बसते अगदी तशाच पद्धतीने व्हिडीओतील चिमुकली घराच्या बाहेर बसली आहे. साडी घालून ती समोरच्या महिलेशी संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे संवादादरम्यान ती डोक्यावरचा पदर ढळू देत नाहीये. यावेळी बोलताना तिचा हजरजबाबीपणा आणि बोलण्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. तिच्या गोड बालण्याने नेटकरी चांगलेच खूश झाले आहेत.

व्डिडीओमध्ये चिमूकली काय म्हणतेय ?

व्हिडीओमध्ये सुरुवातीला चिमुकली बाहेर बसल्याचे दिसताच एका महिलेने तिच्याशी संवाद साधने सुरु केले आहे. “काय वं निवात बसलाय. चहापाणी झाली का ?” असा प्रश्न विचारल्यावर छोट्या मुलीने या महिलेशी बोलणे सुरु केले आहे. “चहा घेतला नाही. सारखी झोप येतेय वो,” असं चिमुकली समोरच्या महिलेला म्हणतेय.

म्हणते मुलीला आवडतो म्हणून वडापाव करणार 

हा संवाद नंतर एवढा रंगत गेला आहे की आपणही त्यामध्ये तल्लीन होतो. व्हिडीओतील चिमुकली तिला एक मुलगी असल्याचे सांगते. तसेच ती खूप खेळत असल्यामुळे तिला सावरुन सावरुन थकवा येतो असेही चिमुकली सांगते. आमच्या पोरीला आवडतो म्हणून मी आज रात्री वडापाव खायला करणार असल्याचेही व्हिडीओतील तरुणी सांगतेय. यानंतरचा संवाद तर अगदीच ऐकण्यासारखा आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ पाहून मूड नक्की फ्रेश होईल

छोटीशी चिमकुली जेव्हा मोठ्या महिलेचं सोंग घेते तेव्हाचा हा प्रसंग पाहण्यासारखा आहे. नेटकरी या चिमुकलीचं भावविश्व पाहून हरखून गेले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच काही लोकांनी या व्हिडीओला विविध समाजमाध्यमांवर शेअरसुद्धा केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहेस, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या गोड मुलीला तुमचा मूड फ्रेश होईल हे मात्र नक्की.

इतर बातम्या :

Video | अंगातील जीमवेस्ट काढून तरुणींसोबत प्रँक, नंतर पोलिसाशी पडली गाठ, तरुणाचं पुढे काय झालं ?

Video | ‘पावरी हो रही है’ नंतर ‘May you all safar’ ची धूम, यशराज मुखातेच्या नव्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

Video | महिलेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल

(marathi small girl behaving like women talking in very funny manner see viral video)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.