Video | महिलेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल

पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या महिलेला रेस्क्यू करण्यात आले आहे. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचा चा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यात ही महिला विहिरीत पडली होती.

Video | महिलेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल
Woman falls in well

मुंबई : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या मात्र, एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या महिलेला रेस्क्यू करण्यात आले आहे. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यात ही महिला विहिरीत पडली होती. (women falls into 50 feet deep well in Kerala Wayanad district video went viral on social media)

महिला 50 फूट खोल विहिरीत पडली

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा केरळमधील वायनाड जिल्ह्यातील आहे. येथे एक महिला पन्नास फूट खोल विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली होती. ही घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला बाहेर काढण्याचे काम केले. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

महिलेला रेस्क्यू करण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न

व्हिडीओमध्ये अतिशय खोल अशी विहीर दिसत आहे. या विहिरीमध्ये एक महिला पडली आहे. व्हिडीओतील महिला विहिरीत कशी पडली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. अग्निशमन दलाचे जवान त्या महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. विहिरीत टाकलेली दोरी बाहेरचे लोक मोठ्या ताकदीने ओढत असल्याचे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ 

व्हिडीओची एकच चर्चा, अग्निशमन दलाचे आभार

शेवटी अथक प्रयत्नानंतर या महिलेला विहिरीतून बाहेर काढण्यात आल्याचे आपल्याला दिसत आहे. महिलेसोबत घडलेल्या या दुर्दैवी घटनेची सगळीकडे एकच चर्चा झाली आहे. या अपघातात महिला किती जखमी झाली याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र, महिलेला वाचवण्यात यश आल्यामुळे लोक अग्निशमन दलाचे आभार मानत आहेत.

इतर बातम्या :

Video | पावसाचं रौद्र रुप, लिफ्टमध्ये पाणी घुसल्याने तरुण-तरुणी अडकले, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | भाऊची हवा, डीजे लावा…! पठ्ठ्याच्या नागिन डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या चिमुकल्याची चांदी, 23 लाखांची कार, भावा होऊ दे हवा !

(woman falls into 50 feet deep well in Kerala Wayanad district video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI