‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या चिमुकल्याची चांदी, 23 लाखांची कार, भावा होऊ दे हवा !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 6:16 PM

आयुष्य बदलायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे आयुष्याबद्दल फारसा विचार कधीच करायचा नाही. आपण प्रामाणिकपणे काम करायचं. फळ मिळायचं तेव्हा मिळेलच. पण आयुष्य मनसोक्तपणे जगायचं.

'बचपन का प्यार' गाणाऱ्या चिमुकल्याची चांदी, 23 लाखांची कार, भावा होऊ दे हवा !
'बचपन का प्यार' गाणाऱ्या चिमुकल्याची चांदी, 23 लाखांची कार, भावा होऊ दे हवा !

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एकाच गाण्याची हवा आहे. जो बघतोय तो या गाण्यावर वेगवेगळे व्हिडीओ बनवताना दिसत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या दिग्गजांना देखील या गाण्याची भुरळ पडली आहे. ते गाणं म्हणजे ‘बचपन का प्यार’ ! छत्तीगडच्या सुकमा येथील सहदेव नावाच्या चिमुकल्याने हे गाणं शाळेत गायलं. शाळेतील कुणीतरी त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यानंतर चमत्कारच झाला. सोशल मीडियावर लोकांनी या गाण्याला डोक्यावर घेतलं. हे गाणं गाणाऱ्या सहदेवचं एवढं कौतुक झालं की MG शोरुमच्या मालकाने त्याच्यावर खूश होऊन चक्क 23 लाखांची MG हेक्टर SUV गिफ्ट म्हणून दिली आहे. ही एक इलेक्ट्रिक कार आहे.

सहदेवचे वडील शेतकरी

आयुष्य बदलायला फार वेळ लागत नाही. त्यामुळे आयुष्याबद्दल फारसा विचार कधीच करायचा नाही. आपण प्रामाणिकपणे काम करायचं. फळ मिळायचं तेव्हा मिळेलच. पण आयुष्य मनसोक्तपणे जगायचं. कधी दु:खात, वाईट परिस्थित, तर कधी सुखात आणि चांगल्या परिस्थितीत समाधानाने आणि सकारात्मक विचारांनी आयुष्य जगत राहायचं. हीच गोष्ट आपल्याला छत्तीसगडच्या सहदेवकडे बघून शिकायला मिळतेय.

सहदेवचे वडील शेतकरी आहेत. त्यांच्या घरात टीव्ही आणि मोबाईलही नाही. सहदेवने दुसऱ्या कुणाच्या मोबाईलवर गाणं ऐकलं होतं. ते गाणं ऐकूणच त्याच्या तोंडपाठ झालं होतं. त्याने हे गाणं त्याच्या शाळेत म्हटलं होतं. त्याच गाण्याने आज सहदेवचं आयुष्य बदलून टाकलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी सहदेवची भेट घेतली

सहदेवचं गाणं लोकप्रिय झाल्यानंतर बॉलिवूड सिंगर बादशाह याने सहदेवशी व्हिडीओ कॉलवर बातचित केली होती. त्यानंतर त्याने त्याला चंदिगडला भेटायला बोलावलं होतं. एवढंच नाही तर सहदेवचं गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सहदेवची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सहदेवला ते गाणं गावून दाखवण्याची फर्माईश केली होती. बघेल यांनी ते गाणं सोशल मीडियावर शेअर केलं होतं. तसेच बचपन का प्यार, वाह, असंही कॅप्शन दिलं होतं.

बादशाह सोबत नवं कोरं गाणं

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंगर बादशाह हा सहदेव सोबत ‘बचपन का प्यार’ हे नवं गाणं घेऊन येत आहे. या गाण्याची शूटिंग देखील संपली आहे. येत्या 11 ऑगस्टला हे गाणं प्रदर्शित होणार आहे. गाण्यात आपल्याला आस्था गिल देखील दिसणार आहे.

हेही वाचा :

Video | स्टेडियममध्ये मॅच बघत होती तरूणी, कॅच पकडायला गेली आणि… पाहा व्हिडीओ

VIDEO : हा व्हिडीओ बघून लोकं जहर का मागताय? तुम्हीच बघा ब्वा…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI