VIDEO : हा व्हिडीओ बघून लोकं जहर का मागताय? तुम्हीच बघा ब्वा…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 5:14 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा कधीच भरोसा नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ अनेकांना पचनी पडताना दिसत नाहीय.

VIDEO : हा व्हिडीओ बघून लोकं जहर का मागताय? तुम्हीच बघा ब्वा...
व्हिडीओ लोकांना पचनी पडत नाहीय

Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा कधीच भरोसा नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ अनेकांना पचनी पडताना दिसत नाहीय. कारण त्यामागे देखील एक खास कारण आहे. व्हिडीओत एक सुंदर मुलगी एका तरुणासोबत चुंबन घेताना दिसतेय. पण जेव्हा तरुण चुंबन घेतल्यानंतर हसतो तेव्हा त्याचे मोठमोठे दात दिसतात. ते बघून आपल्या हसू येईलच. पण एवढ्या सुंदर मुलीने दात मोठे असलेल्या तरुणाला किस करणं हे लोकांच्या पचनी पडताना दिसत नाहीय. त्यामुळेच अनेक लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

नेमकं व्हिडीओत काय?

व्हिडीओत एक सुंदर मुलगी टेबलवर बसली आहे. तिच्या बाजूलाच एक मोठमोठी दातं असलेला तरुण बसलेला आहे. दोघांच्या हातात जूसचा ग्लास आहे. तो तरुण आधी कॅमेऱ्यात बघतो. तेव्हा त्याची मोठमोठी दातं स्पष्टपणे दिसत आहेत. व्हिडीओत सुरुवातीला तो कॅमेऱ्याकडे बघत असतो. नंतर जसजसा कॅमेरा क्लोज जातो तसं ती मुलगी त्या तरुणाला प्रेमाने किस करते. मुलीचं प्रेम बघुन मुलगाही खूश होतो. कॅमेऱ्यात या सगळ्या घडामोडी अगदी अचूकपणे कैद झाल्या आहेत.

नेटीझन्सच्या मजेशीर प्रतिक्रिया

संबंधित व्हिडीओवर नेटीझन्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. या दुनियेत कधी काय होईल, याचा भरोसा नाही, अशी प्रतिक्रिया एका युजरने व्हिडीओ बघून दिली आहे. तर दुसऱ्या एका तरुणाने देवा सिंगल पोरांवर एवढा अन्याय का? असं बोलताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ giedde नावाच्या युजर आयडीवरुन इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडत आहे. याशिवाय जोडीदाराबाबत शेवटी ज्याचं त्याचं नशीब. त्यामुळे या व्हिडीओला मजामस्ती म्हणूनच बघितला जातोय.

व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

फोटो काढण्याच्या नादात थेट पाण्यात, फोटोग्राफरला पाहून नवरी-नवरदेव घाबरले, व्हिडीओ पाहाच

Video | स्टेडियममध्ये मॅच बघत होती तरूणी, कॅच पकडायला गेली आणि… पाहा व्हिडीओ

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI