Video | पावसाचं रौद्र रुप, लिफ्टमध्ये पाणी घुसल्याने तरुण-तरुणी अडकले, पाहा व्हायरल व्हिडीओ

सध्या अमेरिकेतील पावसाचे रौद्र रुप समोर आले आहे. येथील मुसळधार पावसाचे हादरवून सोडणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. हा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे.

Video | पावसाचं रौद्र रुप, लिफ्टमध्ये पाणी घुसल्याने तरुण-तरुणी अडकले, पाहा व्हायरल व्हिडीओ
AMERICA RAIN VIDEO


मुंबई : हवामान बदलामुळे नैसर्गिक संकटांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भूस्खलन, पाऊस, वादळ हे तर नित्याचेच झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका फक्त भारतालाच बसतोय असे नाही. तर जगभरात अनेक देश अशा संकटांना तोंड देत आहेत. सध्या अमेरिकेतील पावसाचे रौद्र रुप समोर आले आहे. येथील मुसळधार पावसाचे हादरवून सोडणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. हा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होत आहे. (young girls and boys trapped in lift video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अमेरिकेतील ओमाहा नेब्रेसका भागातील आहे. व्हिडीओमध्ये या भागात झालेल्या भीषण पावसाची स्थिती दाखवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी थेट लिफ्टमध्ये घुसल्याचे आपल्याला दिसतेय. अचानकपणे पाणी घुसल्यामुळे काही तरुण-तरुणी लिफ्टमध्येच अडकले होते.

खाली उतरताना लिफ्टमध्ये अचानकपणे पाणी साचले

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील टोनी लू आणि त्यांचे काही दोस्त रात्रीच्या दहा वाजता लिफ्टनेखाली जात होते. लिफ्टमधून खाली उतरत असताना त्या भागात चांगलाच पाऊस होत होता. रस्त्यावर तसेच घरात सगळीकडे पाणी साचलेले होते. अशा परिस्थितीत हे तरुण घराबाहेर पडत होते. मात्र, खाली उतरत असतानाच लिफ्टमध्ये अचानकपणे पाणी साचले. बघता बघता हे पाणी थेट त्यांच्या छातीपर्यंत आले. हा सर्व फ्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन लिफ्टमध्ये अकडकलेल्या एका तरुणाने मित्रांना फोन केला. नंतर मित्र आणि पोलिसांच्या मदतीने लिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तरुण-तरुणींना वेळीच बाहेर काढण्यात यश आल्यामुळे मोठा धोका टळला अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

इतर बातम्या :

Video | भाऊची हवा, डीजे लावा…! पठ्ठ्याच्या नागिन डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या चिमुकल्याची चांदी, 23 लाखांची कार, भावा होऊ दे हवा !

VIDEO : हा व्हिडीओ बघून लोकं जहर का मागताय? तुम्हीच बघा ब्वा…

(young girls and boys trapped in lift video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI