Video | अंगातील जीमवेस्ट काढून तरुणींसोबत प्रँक, नंतर पोलिसाशी पडली गाठ, तरुणाचं पुढे काय झालं ?

सध्या मात्र, एक वेगळाच व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण तरुणींना पाहून आपली जिमवेस्ट काढून फेकत आहे. उघडे शरीर दाखवत तो तरुणींना घाबरवत आहे.

Video | अंगातील जीमवेस्ट काढून तरुणींसोबत प्रँक, नंतर पोलिसाशी पडली गाठ, तरुणाचं पुढे काय झालं ?
prank viral video

मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रँकच्या माध्यमातून अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी करतात. यामध्ये काही थरारक स्टंट्सचादेखील समावेश असतो. सध्या मात्र, एक वेगळाच व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण तरुणींना पाहून आपली जिमवेस्ट काढून फेकत आहे. उघडे शरीर दाखवत तो तरुणींना घाबरवत आहे. मात्र, एका महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (boy doing prank with girls by removing his gym vest video went viral on social media)

तरुण देहयष्टीच्या माध्यमातून तरुणींना भीती घालतोय

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. सध्या एक तरुण चर्चेत येण्यासाठी प्रँक करत असल्याचे दिसतेय. यामध्ये तो आपल्या देहयष्टीच्या माध्यमातून तरुणींना भीती घालत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. मात्र, प्रँकच्या शेवटी त्याचा पंगा एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी पडला आहे. त्यानंतर मात्र, हा तरुण चांगलाच घाबरला आहे.

तरुणाला पाहून तरुणी चांगल्याच घाबरत आहेत

व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एक तरुण लिफ्टमध्ये उभा आहे. लिफ्टमध्ये असताना समोर तरुणी दसताच तो घातलेली जिमवेस्ट काढून फेकत आहे. तसेच नंतर रागात येऊन तो तरुणींकडे जात आहे. हा सर्व प्रकार पाहून तरुणी त्याला चांगल्याच घाबरत आहेत. थोड्या वेळान मात्र या तरुणाची एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी गाठ पडली आहे.

खोड काढलेली महिला निघाली पोलीस अधिकारी  

तरुणाने सुरुवातीला महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर आपली जीमवेस्ट काढली आहे. तसेच हा तरुण नंतर महिला पोलीस अधिकाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जवळ जाताच खोड काढत असेलेली तरुणी ही एक महिला पोलीस अधिकारी असल्याचे त्याला समजले आहे. नंतर मात्र तो चांगलाच घाबरला आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Jattplanet (@jatt_planet)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. या व्हिडीओला नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात आल्याचं दिसतंय. तसेच व्हिडीओतील महिला पोलीस अधिकारी खरंच पोलीसदलात कार्यरत आहे का ? याची पुष्टी झालेली नाही. मात्र या व्हिडीओला लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | ‘पावरी हो रही है’ नंतर ‘May you all safar’ ची धूम, यशराज मुखातेच्या नव्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

Video | मोठ्या थाटात आयफेल टॉवर पाहायला गेली, पण घडलं मात्र वेगळंच, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Video | पावसाचं रौद्र रुप, लिफ्टमध्ये पाणी घुसल्याने तरुण-तरुणी अडकले, पाहा व्हायरल व्हिडीओ

(boy doing prank with girls by removing his gym vest video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI