Video | ‘पावरी हो रही है’ नंतर ‘May you all safar’ ची धूम, यशराज मुखातेच्या नव्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

यावेळी असाच एक नवा व्हिडीओ यशराज मुखाते घेऊन आला आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक मजेदार मॅशअप अपलोड केले आहे. “May you all safar” हे मॅशअप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

Video | 'पावरी हो रही है' नंतर 'May you all safar' ची धूम, यशराज मुखातेच्या नव्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
yashraj mukhate viral video

मुंबई : सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या शॉर्ट व्हिडीओंची धूम आहे. इन्स्टाग्राम रिल्स तसेच इतर शॉर्ट व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या चवीने पाहिले जातात. यात म्यूझिक कंपोझर यशराज मुखातेचे मॅशअप म्हणजे मनोरंजनाची वेगळीच पर्वणी असते. यशराज मुखातेचे (Yashraj Mukhate) छोटे मॅशअप व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यावेळी असाच एक नवा व्हिडीओ यशराज मुखाते घेऊन आला आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक मजेदार मॅशअप अपलोड केले आहे. “May you all safar” हे मॅशअप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. (May you all safar Yashraj Mukhate new mashup short video went viral on social)

यशराजचा May you all safar नवा मॅशअप व्हिडीओ

यशराज ने ‘रसोड़े में कौन था’, ‘पावरी हो रही है’ और ‘त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता’ असे एकापेक्षा एक मॅशअप तयार केले आहेत. त्याच्या या मॅशअपमुळे सोशल मीडियावरील वातावरण ढवळून निघाले होते. नेटकऱ्यांनी त्याच्या या मजेदार व्हिडीओंना पसंद तर केलेच. मात्र, अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनीसुद्धा त्याच्या या मॅशअप्सना सोशल मीडियावर शेअर केले होते. यशराजच्या या यूनिक कंटेंटचे नेटकरी दिवाने आहेत. यानंतर आता यशराजने “May you all safar” हा नवा मॅशअप व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याचा हा व्हिडीओ अतिशय मजेदार आणि मनोरंजनात्मक आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला मला प्रवास करायला खूप आवडतं असं सांगताना दिसत आहे.

व्हिडीओला लाखो लोकांचे लाईक

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये यशराजने शेहेराजादे नूर पीरजादा उर्फ ​​’बाजी बॉम्बैस्टिक’ यांच्या व्हिडीओचे मॅशअप केले आहे. या व्हिडीओमध्ये शेहेराजादे या फिरायला आलेल्या आहेत. त्या त्यांच्या मोबाईलचा सेल्फी कॅमेरा सुरु करुन बोलत आहेत. यामध्ये त्या ‘मला फिरायला खूप आवडतं. आय लव्ह टू सफर, मे यू ऑल सफ़र’ असं म्हणताना दिसत आहेत. याच मूळ व्हिडीओमध्ये काही विनोदात्मकता दिसल्यामुळे यशराजने त्याचे मॅशअप तयार केल आहे. मॅशअपला आतार्यंत चार लाख लोकांनी लाईक केले असून लाखो लोकांनी पाहिले आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ शेअर करताना यशराजने ‘तुम्ही सगळे प्रवास करा, हा व्हिडीओ सगळ्या भटकाणाऱ्या आणि पीडित लोकांना समर्पित’ असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला आहे. लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स करत असून त्याला शेअरसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video | महिलेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Video | मोठ्या थाटात आयफेल टॉवर पाहायला गेली, पण घडलं मात्र वेगळंच, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Video | पावसाचं रौद्र रुप, लिफ्टमध्ये पाणी घुसल्याने तरुण-तरुणी अडकले, पाहा व्हायरल व्हिडीओ

(May you all safar yashraj mukhate new mashup short video went viral on social)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI