Video | मोठ्या थाटात आयफेल टॉवर पाहायला गेली, पण घडलं मात्र वेगळंच, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या एक मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ जगप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या परिसरातील आहे. आयफेल टॉवरच्या परिसरात एका महिलेची चांगलीच फजिती झाली आहे.

Video | मोठ्या थाटात आयफेल टॉवर पाहायला गेली, पण घडलं मात्र वेगळंच, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच
viral video

मुंबई : सोशल मीडियावर रोजच कोणत्या ना कोणत्या व्हिडीओची चर्चा असते. कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या एक मजेदार व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ जगप्रसिद्ध आयफेल टॉवरच्या परिसरातील आहे. आयफेल टॉवरच्या परिसरात एका महिलेची चांगलीच फजिती झाली आहे. महिलेच्या फजितीचा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. (woman in eiffel tower premises slipping on descending video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

जवळजवळ प्रत्येकालाच वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाला जाण्यासाची हौस असते. याच आवडीपोटी लोक जगातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देतात. पर्यटनादरम्यान एखाद्या प्रसिद्ध वास्तूसमोर आल्यानंतर तो क्षण कॅमेऱ्यात कैद करावा असे प्रत्येकालाच वाटते. प्रत्येकजण फोटो, व्हिडीओंच्या माध्यमातून या आठवणी जपण्याचा प्रयत्न करतो. मात्र, आयफेल टॉवरजवळ व्हिडीओ तयार करताना एका महिलेसोबत भलतंच घडलं आहे. व्हिडीओ शूट करताना ती आयफेल टॉवरच्या परिसरात असलेल्या उतारावरुन चक्क घसरुन पडली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

एका क्षणात महिला खाली घसरली

व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एक महिला आयफेल टॉवरच्या खाली उभी आहे. समोरची एक व्यक्ती या महिलेचा व्हिडीओ शूट करत आहे. व्हिडीओ सुरु होताच ती आयफेल टावरच्या परिसरात असलेल्या उतारावरुन खाली येत आहे. मात्र, खाली येत असताना या महिलेचे संतूलन बिघडले आहे. परिणामी ती एका क्षणात घसरल्याचे दिसतेय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Young Landlord (@younglandlord01)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला younglandlord01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | पावसाचं रौद्र रुप, लिफ्टमध्ये पाणी घुसल्याने तरुण-तरुणी अडकले, पाहा व्हायरल व्हिडीओ

Video | भाऊची हवा, डीजे लावा…! पठ्ठ्याच्या नागिन डान्समुळे सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बचपन का प्यार’ गाणाऱ्या चिमुकल्याची चांदी, 23 लाखांची कार, भावा होऊ दे हवा !

(woman in eiffel tower premises slipping on descending video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI