Video | ना घोडा ना वाजंत्री, पठ्ठ्या मित्रांच्या खांद्यावर बसून आला, नवरदेवाची खास एन्ट्री एकदा पाहाच !

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 13, 2021 | 4:53 PM

सध्या सोशल मीडियावर लग्ननसमारंभाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने अतिशय मजेदार पद्धतीने लग्नमंडपात प्रवेश केलाय.

Video | ना घोडा ना वाजंत्री, पठ्ठ्या मित्रांच्या खांद्यावर बसून आला, नवरदेवाची खास एन्ट्री एकदा पाहाच !
GROOM VIRAL VIDEO
Follow us

मुंबई : सोशल मीडियावर प्राणी, पक्षी तसेच माणसांच्या करामतीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ तर तुम्हाला कळखळून हसायला लावतात. सध्या सोशल मीडियावर लग्नसमारंभाचा एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने अतिशय मजेदार पद्धतीने लग्नमंडपात प्रवेश केलाय. (video of groom who reached in marriage function by sitting on shoulders of his friend video went viral on social media)

मित्रांच्या खांद्यावर बसून नवरदेवाची एन्ट्री 

आपण नेहमी पाहतो नवरदेव म्हटलं की त्याचा थाट काही वेगळाच असतो. मात्र, व्हिडीओमध्ये दिसणारा लग्नसोहळा ग्रामीण भागातील असावा. याच कारणामुळे येथे कसल्याही प्रकाराचा बडेजावपणा नाही. शहरीतील लग्नामध्ये नवरदेव कार किंवा घोड्यावर बसून लग्नमंडपात प्रवेश करतो. मात्र, व्हडीओमध्ये दिसणारा नवरदेव हा आपल्या मित्रांच्या खांद्यावर बसून लग्न सोहळ्यास येत आहे. तसेच कोणतीही वाजंत्री सोबत नसूनदेखील त्याच्या वरातीसमोर त्याचे मित्र अगदी जोशात नाचत आहेत.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने हा लग्नसोहळा सुरु आहे की विनोद, असं म्हटलंय. तर दुसऱ्या नेटकऱ्याने हे लग्न लॉकडाऊनमधील आहे, अशी मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला इन्स्टाग्रामवर official_niranjanm87 या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | नातवाने प्रॉपर्टी मागितली, आजी म्हणते प्रेम पाहिजे की पैसा, मजेदार भांडणाचा व्हिडीओ व्हायरल

Video | “आमच्या घरातलं मीठ संपलंय वं…लै म्हंजी लै कट्टाळा आलाय” मराठमोळ्या चिमुकलीचं गोड बोलणं एकदा पाहाच

Video | हरीण आपल्यातच गुंग, बिबट्या दबा धरून बसला, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, शिकारीचा थरारक व्हिडीओ पाहाच !

(video of groom who reached in marriage function by sitting on shoulders of his friend video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI