Video | हरीण आपल्यातच गुंग, बिबट्या दबा धरून बसला, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, शिकारीचा थरारक व्हिडीओ पाहाच !

सध्या असाच एक अतिशय थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका बिबट्याने हरिणाची अतिशय चाणाक्षपणे शिकार केली आहे.

Video | हरीण आपल्यातच गुंग, बिबट्या दबा धरून बसला, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, शिकारीचा थरारक व्हिडीओ पाहाच !
leopard-attack viral video

मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय थरारक असतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण हसायला लागतो. प्राण्यांच्या शिकारीचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. सध्या असाच एक अतिशय थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका बिबट्याने हरिणाची अतिशय चाणाक्षपणे शिकार केली आहे. (leopard catches deer video went viral on social media)

बिबट्याने मोठ्या शिताफीने हरिणाची शिकार केली

सोशल मीडियावर शिकारीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये बिबट्या, वाघ तसेच सिंहांनी केलेल्या शिकारीचे व्हिडीओ मोठ्या आवडीने पाहिले जातात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ बिबट्या आणि हरिणाचा आहे. या व्हिडीओमध्ये एका बिबट्याने मोठ्या शिताफीने हरिणाची शिकार केली आहे. या सर्व शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक हरिण जंगलात गवत खाताना दिसत आहे. गवत खात असताना त्याचे दुसऱ्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नाहीये. याच वेळेत दुसऱ्या बाजूने एक बिबट्या आला आहे. हरिणाला पाहिल्यामुळे त्याची शिकार करण्यासाठी बिबट्याने चांगलीच तयारी केलीये. तो अतिशय चलाखीने दबक्या पावलाने हरिणाकडे गेला आहे. योग्य वेळ साधत त्याने हरिणारवर हल्ला केलाय. अचानकपणे हल्ला झाल्यामुळे हरिण पुरते गोंधळून गेले आहे. हरिणाला काही समजायच्या आत बिबट्याने त्याचा फडशा पाडलाय.

पाहा व्हिडीओ

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शिकारीचा हा थरार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला ट्विटरवर आयएफएस अधिकारी सुरेंदर मेहरा यांनी शेअर केले आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. ट्विटरवर या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात रिट्वीट केले जात आहे.

इतर बातम्या :

Video | ‘पावरी हो रही है’ नंतर ‘May you all safar’ ची धूम, यशराज मुखातेच्या नव्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

Video | महिलेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल

Video | मोठ्या थाटात आयफेल टॉवर पाहायला गेली, पण घडलं मात्र वेगळंच, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

(leopard catches deer video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI