Video | लेकरानं, सुनेनं घराच्या बाहेर काढलं, पोलीस कमिश्नरनं जे केलं त्याची देशभरात तारीफ, बघा काय झालं?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 12, 2021 | 11:22 PM

एका वृद्ध दाम्पत्याला त्यांच्या मुलाने आणि सुनेने घराबाहेर काढले आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूरमधीला हा प्रकार असून मुलगा आणि सुनेवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Video | लेकरानं, सुनेनं घराच्या बाहेर काढलं, पोलीस कमिश्नरनं जे केलं त्याची देशभरात तारीफ, बघा काय झालं?
kanpur viral video
Follow us

मुंबई : सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. यातील काही घटनांना पाहून आपल्याला आनंद होतो तर काही घटनांमुळे आपले मन विचलितसुद्धा होते. सध्या तर सर्वांना विचार करायला लावणारा प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतभर चर्चीला जातोय. एका वृद्ध दाम्पत्याला त्यांच्या मुलाने आणि सुनेने घराबाहेर काढले आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूरमधीला हा प्रकार असून मुलगा आणि सुनेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. (kanpur old age couple is been pulled out by their son and son in law)

नेमके प्रकरण काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार सध्या चर्चेत आलेला प्रकार हा उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातील आहे. या घटनेत एका वृद्ध दाम्पत्याला त्यांच्या सून आणि मुलाने घराबाहेर काढले आहे. घराबाहेर काढल्यानंतर वृद्ध ताम्पत्याने थेट पोलिसात धाव घेतली. तसेच मदतीची मागणी केली. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर कानपूरचे पोलीस कमिश्नर असीम अरुण यांनी (Aseem Arun) वृद्ध दाम्पत्याची सून आणि मुलगा यांच्यावर कडक कारवाई केली.

वृद्ध दाम्पत्याला नंतर मारहाण करण्यात आली

कानपूरमधील जेके कॉलिनिमध्ये राहणाऱ्या एका वृद्ध दाम्पत्याला त्यांची सून आणि पोटचा मुलगा फार त्रास देत होते. दोन महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरु आहे . हा वाद नंतर विकोपाला गेला. वृद्ध दाम्पत्याला नंतर मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व त्रासाला कंटाळून वृद्ध नवरा-बायकोंनी आपली सून आणि मुलाविरोधात पोलिसात तक्रार दिली. मात्र, त्यानंतरसुद्धा त्यांचा त्रास कमी झाला नाही.

पोलीस कमिश्नर स्वत: दाम्पत्याच्या घरी गेले

मात्र, सून आणि मुलाचा त्रास वाढत गेल्यामुळे वृद्ध नवरा-बायकोंनी थेट पोलीस कमिश्नरकडे धाव घेतली. कानपूरचे पोलीस कमिश्नर असीम अरूण या वृद्ध दाम्पत्याला त्यांच्या हक्काच्या घरी घेऊन गेले. तसेच त्यांना घरात ठेवण्याची सक्त ताकीद दाम्पत्याची सून आणि मुलगा यांना दिली. वृद्धांना न्याय मिळावा म्हणून पोलीस कमिश्नर स्वत: पीडित दाम्पत्याच्या घरी गेल्यामुळे कानपूर पोलीस दलाची वाहवा केली जात आहे. पोलीस कमिश्नर असीम अरुण यांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, वृद्ध दाम्पत्याची सून आणि मुलाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.

इतर बातम्या :

Video | अंगातील जीमवेस्ट काढून तरुणींसोबत प्रँक, नंतर पोलिसाशी पडली गाठ, तरुणाचं पुढे काय झालं ?

Video | ‘पावरी हो रही है’ नंतर ‘May you all safar’ ची धूम, यशराज मुखातेच्या नव्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

Video | महिलेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल

(kanpur old age couple is been pulled out by their son and son in law)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI