पोपटाने गिटारच्या धूनवर गायलं भन्नाट गाणं, नेटकरी हैराण, लाखों युजर्सनी पाहिला Video

या पोपटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत 3 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिलाय.

पोपटाने गिटारच्या धूनवर गायलं भन्नाट गाणं, नेटकरी हैराण, लाखों युजर्सनी पाहिला Video
गाणारा पोपट
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 1:45 PM

मुंबई : पोपट माणासाप्रमाणे बोलतो, भविष्य सांगतो असं तुम्ही ऐकलं असेल. पण गिटारच्या धूनवर गाणं गाणारा पोपट पाहिलाय का? हो असा एक पोपट आहे. ‘Tico The Parrot’ अशा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या पोपटाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 33 सेंकदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत सुमारे 3 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. (Parrot Singing on Guitar Tune Video Got Viral)

काय आहे व्हिडीओ?

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक व्यक्ती गिटार हातात घेऊन वाजवत आहे. त्याचवेळी त्याच्यासमोर बसलेला एक पोपट गिटारच्या धुनवर सूर लावून गाण गाण्याचा प्रयत्न करतोय. हा पोपट क्लासिक रॉक धुनमध्ये गाण्याचा प्रयत्न करताना दिसून येतोय. ‘Tico The Parrot’ असं या प्रसिद्ध पोपटाचं नाव असून @rtnordy या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या

हे ही वाचा :

खाकी वर्दीचे असेही रूप, म्हाताऱ्या महिलेला प्रेमाने भरवला घास, फोटो व्हायरल

Viral Video : भरधाव वेगानं धावणारी वाहनं अन् अचानकपणे महामार्ग खचला, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Video | राजाचा आपल्या राणीसोबत विहार, वाघाची भारदस्त चाल पाहून नेटकरी अवाक्

(Parrot Singing on Guitar Tune Video Got Viral)