Viral Video : भरधाव वेगानं धावणारी वाहनं अन् अचानकपणे महामार्ग खचला, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथील असून राष्ट्रीय महामार्ग 415 वर ही घटना घडली आहे. (national highway collapsed arunachal pradesh video)

Viral Video : भरधाव वेगानं धावणारी वाहनं अन् अचानकपणे महामार्ग खचला, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

इटानगर : सध्या देशात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सध्या अशाच नुकसानीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक रस्ता कोसळल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथील असून राष्ट्रीय महामार्ग 415 वर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर आला असून तो चांगलाच व्हायरल होतोय. (National Highway collapsed due to heavy rain in Arunachal Pradesh Ttanagar video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या अरुणाचल प्रदेशमधील इटानगरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे हा रस्ता चांगलाच खचला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

देशात अनेक नैसर्गिक संकटं

देश सध्या कोरोना महामारीला तोंड देत आहे. त्याबरोबरच मागील काही दिवसांपासून देशाला तौक्ते चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटांना तोंड द्यावं लागतंय. या संकटांमुळे मागील काही दिवसांपासून देशात अस्थितरता आहे. त्यानंतर आता इटानगर येथील रस्ता खचल्याची ही घटना समोर आली आहे.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया 

दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय महामार्ग असलेला रस्ता फक्त पावसाच्या पाण्यामुळे खचल्यामुळे अनेकांनी सरकारला घेरलं आहे. तर अनेकांनी अशी नैसर्गिक संकटं येत असतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

Video | राजाचा आपल्या राणीसोबत विहार, वाघाची भारदस्त चाल पाहून नेटकरी अवाक्

Video | पिळदार देह, बलदंड भुजा, सोशल मीडियावर अनोख्या कांगारूची चर्चा, व्हिडीओ पाहाच

Viral Video : भर रात्री रस्त्यावर विचित्र आकृती, लोक म्हणतायत हा तर एलियन, व्हिडीओ व्हायरल

(National Highway collapsed due to heavy rain in Arunachal Pradesh Ttanagar video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI