AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाकी वर्दीचे असेही रूप, म्हाताऱ्या महिलेला प्रेमाने भरवला घास, फोटो व्हायरल

सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटमध्ये एक पोलीस म्हाताऱ्या महिलेला आत्मियतेने घास भरवताना दिसतोय. (police feeding women viral photo)

खाकी वर्दीचे असेही रूप, म्हाताऱ्या महिलेला प्रेमाने भरवला घास, फोटो व्हायरल
police feeding women viral photo
| Updated on: Jun 01, 2021 | 5:08 PM
Share

मुंबई : समोर पोलीस पाहिल्यानंतर बहुतांश लोक घाबरतात. पोलीस जवळ येताच आता आपले काही खरे नाही, असे प्रत्येकालाच वाटते. नियम मोडले म्हणून पोलिसांनी दिलेला मार, त्यांनी घेतलेली ताठर भूमिका यामळे अनेकांचा तसा समज आहे. मात्र, सध्या असा एक प्रसंग समोर आला आहे, ज्यामुळे लोकांचे वरील सर्व समज दूर होतील. सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटमध्ये एक पोलीस म्हाताऱ्या महिलेला आत्मियतेने घास भरवताना दिसतोय. (Police feeding women photo goes viral on social media)

फोटो पाहून अनेकांनी सॅल्यूट ठोकला

सोशल मीडियावर रोज लाखो फोटो अपलोड केले जातात. यामध्ये काही फोटो आनंद शेअर करणारे असतात. तर काही फोटोंना पाहून आपल्याला भरून येते. सध्या अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक पोलीस समोर बसलेल्या एका महिलेला प्रेमाणे घास भरवताना दिसतोय. या फोटोला पाहून नेटकरी पोलिसाचे कौतूक करत आहेत. या फोटोकडे पाहून अनेकांनी चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटोतील पोलिसाचे समर्पण पाहून अनेकांनी त्यााल सॅल्यूट ठोकला आहे.

पाहा फोटो :

police feeding women viral photo

या फोटमध्ये एक पोलीस म्हाताऱ्या महिलेला आत्मियतेने घास भरवताना दिसतोय.

या फोटोला सोशल मीडियाच्या अनेक मंचावरुन मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. हा फोटो नक्की कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. मात्र, या फोटोला ट्विटवर अनेकांनी लाईक करुन आपल्या खात्यावर रिट्विट केलं आहे. सोबतच समर्पक कॅप्शनसुद्धा दिले आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हायरल होत असलेला हा फोटो ‘Rinku Hooda’ नावाच्या एका युजरे ट्विटरवर शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी ‘पोलिसांचा एक असाही चेहरा असतो’ असे समर्पक कॅप्शन दिले आहे. या फोटोला आतापर्यंत 6 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. काही लोकांनी या फोटोला पाहिल्यानंतर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

इतर बातम्या :

Viral Video : भरधाव वेगानं धावणारी वाहनं अन् अचानकपणे महामार्ग खचला, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

‘मोदी साब…’ काश्मिरी चिमुरडीची हाक शासनाने ऐकली, होमवर्कबाबत महत्त्वाचे आदेश

Video | राजाचा आपल्या राणीसोबत विहार, वाघाची भारदस्त चाल पाहून नेटकरी अवाक्

(Police feeding women photo goes viral on social media)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ