Video : “हाताला प्लास्टर असू द्या की हो, मला बी थोडंसं नाचू द्या की रं!”, लग्नातला भन्नाट डान्स व्हीडिओ व्हायरल…

एका वरातीत एक व्यक्ती जबर जखमी असताना त्याच्या संपूर्ण शरीरावर असलेल्या जखमेला लावलेल्या पट्ट्या आणि गळ्यात सलाईनची बाटली घेऊन बेधुंद नाचत असल्याचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Video : हाताला प्लास्टर असू द्या की हो, मला बी थोडंसं नाचू द्या की रं!, लग्नातला भन्नाट डान्स व्हीडिओ व्हायरल...
| Edited By: | Updated on: May 29, 2022 | 1:10 PM

मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुले लग्नातले भन्नाट व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती लग्नात तुफान डान्स (wedding dance video) करतोय. हा व्यक्ती आजारी आहे. त्याच्या हाताला प्लास्टर दिसतंय. शिवाय सलाईन लावलेली दिसतेय. पण तरिही हा व्यक्ती भन्नाट डान्स करताना दिसतोय. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल (viral video) होत आहे.

राज्यात सर्वत्र सध्या विवाह समारंभ धुमधडाक्यात सुरू आहेत लग्नाच्या वरातीत अनेकांना नाचण्याचा मोह आवरत नसल्याचे व्हीडिओ आपण पाहिले आहेत. आता असाच काही वेगळा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. एका वरातीत एक व्यक्ती जबर जखमी असताना त्याच्या संपूर्ण शरीरावर असलेल्या जखमेला लावलेल्या पट्ट्या आणि गळ्यात सलाईनची बाटली घेऊन बेधुंद नाचत असल्याचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. जखमा बऱ्या होतील हो पण लग्नाची वरात पुन्हा नाही असाच काही त्याला वाटलं असेल, म्हणून शरीरावरील जखमेकडे फारसं लक्ष न देता बँज्योच्या तालावर ठेका धरत नाचत आहे सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सगळ्या जगाचा विसर पडून नाचता यायला हवं…

सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत नातेवाईकांची गर्दी तर जास्त दिसत नाही. मात्र एक जोडपे दिसत आहे. ते नाचत आहे. तर त्यांच्या आजूबाजूला काही व्यक्ती दिसत आहे. डीजे लावला असून त्याच्या तालावर ही मंडळी नाचत आहेत. त्यातीलच एक व्यक्ती या जोडप्यांसोबत नाचता नाचता रस्त्याकडील एका झाडावर आनंदाच्या भरात चढते आणि त्याला हेलकावे खात डान्स करते. मात्र ते झाड कमकुवत झाल्याने ओझ्यामुळे त्याची फांदी तुटते आणि ती व्यक्ती फांदीसह जमिनीवर कोसळते. त्यानंतर आजूबाजूचे लोक पाहायला येतात, मात्र ती व्यक्ती काहीच हालचाल करीत नाही.