AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रिज विक्रीसाठी आहे पण आधी तो शोधून दाखवा!

चित्रात एक मोठा फ्रिज आहे पण तो सहज दिसायला हवा पण हे चित्र बघून लोक गोंधळून जातायत. पण 10 सेकंदात फोटोतील फ्रिज शोधून काढणारे फार कमी लोक आहेत. तुमचे डोळे जर गरुडासारखे तीक्ष्ण असतील तर तुम्हाला हा मोठा फ्रिज नक्कीच दिसेल!

फ्रिज विक्रीसाठी आहे पण आधी तो शोधून दाखवा!
Find the refrigeratorImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 10, 2023 | 11:56 AM
Share

ऑप्टिकल इल्युजन नेहमीच आपल्यासाठी अवघड असतं. हे एक प्रकारचं डिजिटल कोडं असतं. कधी हे डोळ्यांना फसवतं तर कधी मेंदूला. बरेचदा तर आपण नेमकं काय पाहतोय हेच कळत नाही. कारण इथे जे दिसतं तसंच असतं असं नसतं. असाच एक फोटो आपल्याला सोशल मीडियावर सापडला आहे, जो पाहिल्यानंतर लोक गोंधळून गेले आहेत. चित्रात एक मोठा फ्रिज आहे पण तो सहज दिसायला हवा पण हे चित्र बघून लोक गोंधळून जातायत. पण 10 सेकंदात फोटोतील फ्रिज शोधून काढणारे फार कमी लोक आहेत. तुमचे डोळे जर गरुडासारखे तीक्ष्ण असतील तर तुम्हाला हा मोठा फ्रिज नक्कीच दिसेल!

हा फोटो @rahulpassi या ट्विटर युजरने 27 सप्टेंबर रोजी शेअर केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं- ‘फ्रिज विक्रीसाठी आहे’, फ्रिज शोधायला मला ५ मिनिटं लागली असंही त्यांनी पुढे लिहिलं. त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत 18 हजारांहून अधिक लाइक्स आणि 1600 हून अधिक रिट्विट मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्सनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हार मत मानो। कारण जे प्रयत्न करतात ते हार मानत नाहीत. त्यामुळे फ्रिज अजूनही दिसत नसेल तर प्रयत्न करत राहा. फक्त चित्राच्या प्रत्येक कोपऱ्याकडे आणि गोष्टीकडे बारकाईने पहा. नीट पाहिलंत तर काही मिनिटांत आपल्याला फ्रिज दिसू लागेल. तरीही फ्रिज दिसला नाही तर समजा की तुमचं मन खूप चंचल आहे. एकाग्रतेचा अभाव आहे.

हा फोटो व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा फोटो एका फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, फ्रिज विक्रीसाठी. त्या पोस्टला 2 हजारांहून अधिक लाईक्स आणि जवळपास अडीच हजार शेअर्स मिळाले होते. त्यावेळीही लोक फोटोतील फ्रिज शोधत होते. पण सगळ्यांना ते इतक्या सहजासहजी मिळत नाही.

Here is the fridge

Here is the fridge

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन