शिक्षक सायकलवरून द्यायचा झोमॅटोची डिलिव्हरी, एका पोस्टमुळे बदललं आयुष्य, पाहा नेमकं काय घडलं?

| Updated on: Apr 14, 2022 | 2:53 PM

एका 31 वर्षीय शिक्षकाची ही गोष्ट आहे. दुर्गा मीना असं या शिक्षकाचं नाव आहे. या शिक्षकाने काही दिवसांआधी झोमॅटोसोबत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला सुरूवात केली. पण त्याच्याकडे गाडी नसल्याने तो सायकल वरून ऑर्डर पोहोचवायचा. त्याचं काम तो प्रामाणिकपणे करत होता. त्याचा हा प्रामाणिकपणा पाहून आदित्य शर्मा या तरूणाने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला.

शिक्षक सायकलवरून द्यायचा झोमॅटोची डिलिव्हरी, एका पोस्टमुळे बदललं आयुष्य, पाहा नेमकं काय घडलं?
व्हायरल फोटो
Follow us on

मुंबई : सध्या इंटरनेटमुळे (Internet) जग अगदी जवळ आलंय. एक पोस्टमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीला पटकन मदत पोहोचते. त्यामुळे वेळ तर वाचतोच शिवाय गरजवंताची गरजही भागते. याचा प्रत्यय नुकताच आला. एक ट्विट आणि एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयला (Zomato Delivery Boy) अवघ्या काही तासात मदत मिळाली. एका नेटकऱ्याने राजस्थानमधल्या (Rajsthan) एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा फोटो शेअर केला. उन्हाच्या कडक्यात तो सायकलवरून डिलिव्हरी पोहोचवत होता. हे ट्विट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालं. अनेकांनी हा फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केला. त्याचा परिणाम असा झाला की या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मदतीचा ओघ सुरू झाला. नेटकऱ्यांनी मागचा-पुढचा विचार न करता या डिलिव्हरी बॉयला मदत केली. त्याचा परिणाम असा झाला की, एवढे पैसे जमा झाले की त्या व्यक्तीला टू-व्हीलर खरेदी करता येईल एवढे पैसे जमा झाले. त्याने आता नवी गाडी खरेदी केली आहे.

नेमकं काय झालं?

एका 31 वर्षीय शिक्षकाची ही गोष्ट आहे. दुर्गा मीना असं या शिक्षकाचं नाव आहे. या शिक्षकाने काही दिवसांआधी झोमॅटोसोबत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला सुरूवात केली. पण त्याच्याकडे गाडी नसल्याने तो सायकल वरून ऑर्डर पोहोचवायचा. त्याचं काम तो प्रामाणिकपणे करत होता. त्याचा हा प्रामाणिकपणा पाहून आदित्य शर्मा या तरूणाने त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला.

इंटरनेटवरून मदत, खरेदी केली गाडी

आदित्य शर्मा या तरूणाने या शिक्षकाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यातून आर्थिक मदत गोळा झाली. अवघ्या 24 तासात 1 लाख 90 हजार रुपये जमा झाले. या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला गाडी खरेदी करता आली.

“आज मला माझी ऑर्डर वेळेवर मिळाली आणि माझ्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी बॉय सायकलवर आला. आज माझ्या शहराचे तापमान 42 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. राजस्थानच्या कडक उन्हात त्यांनी माझी ऑर्डर वेळेवर पोहोचवली. म्हणून मी त्याच्याशी थोडे बोललो. तिचे नाव दुर्गा मीना असून ती 31 वर्षांची आहे. तो चार महिन्यांपासून डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून, महिन्याला सुमारे 10 हजार रुपये कमावतात”, असं ट्विट आदित् शर्माने केलं. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला.

आदित्यने नुकतंच एक ट्विट केलंय. ज्यात आम्ही करून दाखवलं, असं त्याने म्हटलंय.