Video : रत्नागिरीत आंबे खाण्याची स्पर्धा, चिमुकल्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, अनोख्या स्पर्धेची सर्वत्र चर्चा…

| Updated on: May 21, 2022 | 5:43 PM

रत्नागिरी : सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे आंबे खाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. अश्यात जर आंबे खाण्याची स्पर्धा एखाद्याने भरवली तर? त्याला चांगला प्रतिसाद मिळणं स्वाभाविक आहे. अश्याच एका स्पर्धेची सध्या जोरदार चर्चा आहे. ही स्पर्धा आहे आंबे खाण्याची. हापूस आंब्याचे माहेरघर म्हणुन कोकणाची ओळख. फळांचा राजा असणा-या हापूस आंबा खाण्याची स्पर्धा रत्नागिरीतल्या तोणदे गावात […]

Video : रत्नागिरीत आंबे खाण्याची स्पर्धा, चिमुकल्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, अनोख्या स्पर्धेची सर्वत्र चर्चा...
Follow us on

रत्नागिरी : सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे आंबे खाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. अश्यात जर आंबे खाण्याची स्पर्धा एखाद्याने भरवली तर? त्याला चांगला प्रतिसाद मिळणं स्वाभाविक आहे. अश्याच एका स्पर्धेची सध्या जोरदार चर्चा आहे. ही स्पर्धा आहे आंबे खाण्याची. हापूस आंब्याचे माहेरघर म्हणुन कोकणाची ओळख. फळांचा राजा असणा-या हापूस आंबा खाण्याची स्पर्धा रत्नागिरीतल्या तोणदे गावात रंगलीय.रत्नागिरीतील तोणदे या गावात असणा-या हापूस अँग्रो टूरिझममध्ये ही स्पर्धा रंगली.

आंबे खाण्याची स्पर्धा

हापूस आंब्याचे माहेरघर म्हणुन कोकणाची ओळख. फळांचा राजा असणा-या हापूस आंबा खाण्याची स्पर्धा रत्नागिरीतल्या तोणदे गावात रंगलीय.रत्नागिरीतील तोणदे या गावात असणा-या हापूस अँग्रो टूरिझममध्ये ही स्पर्धा रंगली. खास बच्च कंपनीसाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती अगदी सात वर्षापासूनची मुलं या स्पर्धेत सहभागी झाली होती विशेष म्हणजे आंब्याच्या बागेत ही स्पर्धा घेण्यात आली. जवळपास 25 पेक्षा अधिक मुलं या स्पर्धेत सहभागी झाली होती 5 मिनीटे या स्पर्धेसाठी दिली गेली आणि या 5 मिनीटात जास्तीत जास्त आंबे खाण्यासाठी मुलांची चढाओढ सुरु झालीय हापूस आंब्यावर यथेच्छ ताव मारला.

अश्या या अनोख्या स्पर्धेची सध्या जोरदार चर्चा आहे. हटके स्पर्धेला परिसातील लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेत परिसरातील चिमुकल्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हाला या स्पर्धेत सहभागी होऊन आनंद झाला असल्याचं या चिमुकल्यांनी सांगितलं.

आंबे खायला मला आधीपासूनच आवडतात आणि अशी एक वेगळी स्पर्धा ठेवल्याने आम्हाला भरपूर आंबे खाता आले. त्यामुळे आम्ही आयोजकांचे आभार मानतो, असं या स्पर्धेत सहभागी झालेल्या चिमुकल्या स्पर्धकांनी सांगितलं.