12 मुली, 53 पुरुष अन्… फार्महाऊसमधून येत होता जोरदार आवाज, पोलिस येताच 1600-2800 रुपयांचे उघडले रहस्य

एका फार्महाऊसमधून 65 जणांना पकडण्यात आले आहेत. यामध्ये 12 मुली आणि 53 पुरुष होते. पोलिसांनी सांगितले की, यात कॅनडाहून आलेला एक महाविद्यालयीन विद्यार्थींचा समावेश आहे. पोलिस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

12 मुली, 53 पुरुष अन्... फार्महाऊसमधून येत होता जोरदार आवाज, पोलिस येताच 1600-2800 रुपयांचे उघडले रहस्य
party
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 06, 2025 | 3:45 PM

एका श्रीमंत भागातील फार्महाऊसमध्ये पोलिसांच्या छाप्यामध्ये 65 जणांना पकडण्यात आले आहेत. यात 12 मुली, 22 अल्पवयीनही समाविष्ट आहेत. पोलिसांनी सांगितले की, आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारीनंतर फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला. पोलिसांना त्या ठिकाणाहून अश्लील वस्तू मिळाल्या, ज्यात दारूच्या बाटल्या आणि गावठी भांग यांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. मुख्य आरोपीचा कॅनडाशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे.

एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील मोइनाबाद शहरात एका फार्महाऊसमध्ये चाललेल्या रेव पार्टीचा पर्दाफाश झाला आहे. यामध्ये किमान 65 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अहवालानुसार, एका फार्महाऊसवर रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ओक्स फार्महाऊसवर छापा मारला. हा छापा राजेंद्रनगर स्पेशल ऑपरेशन टीम (एसओटी) पोलिसांनी मारला. या छापेमारीत वेगवेगळ्या प्रकारचे आमंली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

वाचा: खराब झालेली दारू कशी ओळखावी? तज्ज्ञाने सांगितल्या सोप्या 3 पद्धती, नक्की तापासून पाहा

1200 आणि 2800 चा संबंध

पोलिसांनी सांगितले की, टीम जेव्हा घटनास्थळी पोहोचली तेव्हा तिथे एकूण 65 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये 22 अल्पवयीनही समाविष्ट होते. पोलिसांनी सांगितले की, पार्टीत 12 मुली होत्या. अहवालात दावा करण्यात आला आहे की, सर्वजण नशेत होते. पार्टीचा प्रचार एका इंस्टाग्राम अकाउंटद्वारे करण्यात आला होता. ज्याला कथितरित्या हैदराबादचा एक डीजे चालवत होता. पार्टीसाठी प्रवेश पासजारी एकट्यांसाठी 1600 रुपये आणि जोडप्यांसाठी 2800 रुपयांच्या दराने विकले गेले होते. पोलिसांनी तापसणी केल्यानंतर सर्वजण नशेत असल्याचे स्पष्ट झाले.

कॅनडा रिटर्न पार्टी

पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आले की, पार्टीच्य होस्टची ओळख ईशान अशी झाली आहे. तो एका खासगी महाविद्यालयात द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. तो २०२४ मध्ये कॅनडाहून भारतात परत आला होता. त्याच्यावर आमंली पदार्थांच्या सेवनाचा आरोप करण्यात आला आहे. त्याचे वडील सध्या कॅनडामध्ये राहत आहेत. अधिकाऱ्यांनी फार्महाऊस परिसरातून परदेशी दारूच्या १० बाटल्या जप्त केल्या. पोलिसांनी एनडीपीएस (नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स) कायद्याच्या कलम 27 अंतर्गत प्रकरण नोंदवले आहे.