
नंबर प्लेटशिवाय रस्त्यावरून वाहन नेल्यास वाहतूक पोलीस कारवाई करतो. तो दंड वसूल करतो. अनेकदा रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या प्लेटचा रंग वेगवेगळा दिसतो. सर्वसामान्य वाहनांसाठी पांढऱ्या रंगाची पाटी वापरली जाते. त्यावर अनेकजण वाट्टेल तशी नकाशी कोरतात ते भाग वेगळा. पण सामान्य वाहनांसाठी पांढरी पाटी वापरली जाते. तर आता इलेक्ट्रिक वाहनासाठी हिरवी नंबर प्लेट वापरण्यात येते. पण तुम्हाला देशात लाल रंगाची नंबर प्लेट सुद्धा वाहनांसाठी वापरण्यात येते, हे माहिती आहे का? 99 टक्के लोकांना कोणत्या वाहनांसाठी ही नंबर प्लेट वापरतात हे माहिती नाही.
कोणत्या वाहनांसाठी वापरतात लाल रंगाची नंबर प्लेट?
राष्ट्रपती आणि राज्यपाल : भारताचे राष्ट्रपती आणि राज्यांच्या राज्यपालांच्या कारवर लाल रंगाची नंबर प्लेट दिसते. या लाल रंगाच्या पाटीवर आकड्यांऐवजी अशोक चिन्ह असते. त्यामुळे ही वाहनं खास दिसतात. त्यांचा लूक बदलतो. त्यावरून ही कार व्हिआयपीची असल्याचा थेट संदेश जातो.
चाचणी होत असलेले वाहन : जेव्हा वाहन उत्पादन करणारी कंपनी, त्यांची नवीन कार चाचणीसाठी वा प्रसिद्धीसाठी ते वाहन रस्त्यावर उतरवते, त्यावेळी अशा वाहनांवर लाल रंगाची पाटी असते. त्यावरून ही कार विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचे समजते. तर ही कारची टेस्टिंग सुरू असल्याचे समोर येते.
लाल रंगाच्या नंबर प्लेटचे महत्त्व
लाल रंगाची नंबर प्लेट ही देशातील काही सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती विशेषासाठी राखीव आहे. ही नंबर प्लेट एकप्रकारे सुरक्षा आणि प्रतिष्ठेचे प्रतिक आहे. ही नंबर प्लेट सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या वाहनांसाठी वापरता येत नाही.
इतर रंगाच्या नंबर प्लेट
देशात लाल रंगा व्यतिरिक्त इतर रंगांच्या नंबर प्लेटचा वापर करण्यात येतो. यामध्ये प्रत्येक रंगाचे एक वेगळे महत्त्व आहे.
पांढरा रंग : सर्वसामान्यांच्या वाहनासाठी वापर होतो
पिवळा रंग : व्यावसायिक वाहनांसाठी या रंगाची नंबर प्लेट वापरतात
हिरवा रंग : इलेक्ट्रिक वाहनांसाठी हिरवा रंग
निळा रंग : परदेशी दुतावासाच्या वाहनांसाठी हा रंग वापरतात