Rhino Attack : नॅशनल पार्कमध्ये गेंडा चक्क काळ बनून पर्यटकांच्या जीपसमोर उभा ठाकला, पण.. काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Rhino Attack : नॅशनल पार्कची भ्रमंती हा अनेकासाठी अविस्मरणीय अनुभव असतो. आतापर्यंत पुस्तकात, टीव्हीवर पाहिलेले प्राणी डोळ्यासमोर अनुभवता येतात. पण काहीवेळा हा सुखद अनुभव धक्कादायक सुद्धा ठरतो. असमच्या नॅशनल पार्कमधील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा काळ सुरु आहे. मुलांच्या शाळांना सुट्टया लागल्या आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी ही एक चांगली वेळ आहे. म्हणून अनेक लोक कुटुंबासह भ्रमंतीसाठी कुठे ना कुठे जात आहेत. काही जणांची थंड हवेच्या ठिकाणांना पसंती आहे, तर काही जण जंगल सफारीचा पर्याय निवडतायत. जंगल सफारी हा एक रोमांचक अनुभव असतो. वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, हरीण असे प्राणी जवळून अनुभवता येतात. पण काही वेळा अपवादानेच ही जंगल सफारी भितीदायक अनुभव सुद्धा देऊन जाते. असाच असमच्या मानस नॅशनल पार्कमधील अंगावर काटा आणणार एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ धडकी भरवणारा आहे.
जंगल भ्रमंती सुरु असताना अचानक पर्यटकांना गेंड्याच दर्शन झालं. पर्यटकांच्या जीपसमोर हा गेंडा आला. पर्यटक कुतूहलाने या गेंड्याला न्याहाळत असताना त्या गेंड्याने अचानक आपल्या शिंगाने या जीपवर हल्ला केला. त्याने आपल्या शिंगाने जीप उलटवण्याचा प्रयत्न केला. यातून त्याची ताकद दिसली. व्हिडिओमध्ये दिसतय या गेंड्याने अजून जरा ताकद लावली असती तर सहज जीप उलटवू शकला असता. पण पर्यटकांचं नशीब बलवत्तर होतं. तो पुढे निघून गेला. ज्या पर्यटकांनी हा प्रसंग अनुभवला, त्यांची भितीने गाळणच उडाली. असमच्या मानस नॅशनल पार्कमध्ये हा प्रकार घडला.
नशीब त्यांनी हालचाल केली नाही
बांसबाडी रेंजमध्ये या गेंड्याने पर्यटकांच्या जीपवर हल्ल्याचा प्रयत्न केला. असम जगल सफारीसाठी जगभरात प्रसिद्ध ठिकाण आहे. व्हिडिओमध्ये गेंडा आपल्या शिंगाने जीप उचलताना दिसतो. जीप त्याने जागेवरुन हलवली यावरुन त्याची ताकद दिसते. सुदैवाने पर्यटकांनी आणि जीप ड्रायव्हरने त्यावेळी काही हालचाल केली नाही. अन्यथा काय अनर्थ ओढवला असता, याची कल्पनाच न केलेली बरी. काही क्षणासाठी असं वाटलं की, हा गेंडा आता जीपच उलथवून टाकेल.
ड्रायव्हरने धैर्य सोडलं नाही
या भयानक काळात ड्रायव्हरने धैर्य सोडलं नाही. योग्य वेळ दिसताच त्याने लगेच तिथून जीप बाहेर काढली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने कोणीही या हल्ल्यात जखमी झालेलं नाही.
असम की एक जंगल सफारी में गेंडे में सफारी जीप पर हमला कर दिया…. pic.twitter.com/O7LXWSVYML
— आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) May 17, 2026
ही पहिली घटना नाहीय
रिपोर्ट्सनुसार मानस नॅशनल पार्कमधील ही पहिली घटना नाहीय.मागच्यावर्षी सालबाडी रेंजमध्ये सुद्धा एका गेंड्याने अशाच प्रकारे सफारी जीपवर हल्ला केलेला. त्यावेळी सुद्धा गेंडा वाहन उलटवण्याचा प्रयत्न करताना दिसला होता. सुदैवाने त्यावेळी सुद्धा कुठलीही जिवीतहानी झाली नव्हती.