जेव्हा जगातली सर्वात उंच मुलगी विमानाने प्रवास करते…

| Updated on: Nov 06, 2022 | 11:53 AM

रुमेसा गेलगीची उंची 7 फूट 7 इंच आहे, साहजिकच विमानात प्रवाशांसाठी वापरण्यात आलेली सीट रुमेसासाठी पुरेशी नव्हती.

जेव्हा जगातली सर्वात उंच मुलगी विमानाने प्रवास करते...
Rumeysa Gelgi
Image Credit source: Instagram
Follow us on

जगातील सर्वात लांब मुलीचा सोशल मीडियावरील पहिला हवाई प्रवास लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मुलीची उंची इतकी मोठी आहे की विमानात त्याची व्यवस्था करण्यासाठी एक, दोन नव्हे तर 6 सीट वापरावी लागली. रुमेसा गेलगी असं या मुलीचं नाव आहे. तिची उंची 7 फूट 7 इंच आहे. आता इतकी उंची असल्यामुळे साहजिकच विमानात प्रवाशांसाठी वापरण्यात आलेली सीट रुमेसासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे विमान कंपन्यांनी रुमेसासाठी एक सीट तयार करण्यासाठी 6 आसनं एकमेकांना जोडून एक मोठी सीट तयार केली. जेणेकरून ती आरामात प्रवास करू शकेल.

रुमेसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या पहिल्या विमान प्रवासाचे काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रुमेसा तुर्की एअरलाइन्सच्या विमानात लांब सीटवर पडलेली दिसत आहे.

जगातील सर्वात उंच मुलीच्या पहिल्या हवाई प्रवासासाठी सहा इकॉनॉमी सीटचे स्ट्रेचरमध्ये रुपांतर करण्यात आले. या मुलीने अशाच प्रकारे तुर्की ते अमेरिका असा 13 तासांचा प्रवास केलाय.

ही स्टोरी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून लोकांना आश्चर्याचा धक्का बसतोय. तुर्कीमध्ये राहणारी रुमेसा ही द ग्रेट खलीपेक्षा उंच आहे.

खरं तर खलीची उंची 7 फूट एक इंच आहे. जगातील सर्वात उंच मुलगी तसेच सर्वात लांब हाताचा पंजा होण्याचा विक्रम रुमेसाच्या नावावर आहे.