Russian-Ukrainian Couple: युद्धकाळात प्रेमविवाह! रशियन मुलाचे युक्रेनियन मुलीशी लव्ह मॅरेज, तेही भारतात!

Russian-Ukrainian Couple Viral: दोन वेगवेगळ्या आणि शत्रू असणाऱ्या या देशांमधील हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात बऱ्याच महिन्यांपासून होते. त्यांनी आपल्याच देशांतील युद्धाच्या कोलाहलापासून दूर गाठ बांधण्यासाठी हिमालयातील शांत शहर धर्मशाळा निवडले.

Russian-Ukrainian Couple: युद्धकाळात प्रेमविवाह! रशियन मुलाचे युक्रेनियन मुलीशी लव्ह मॅरेज, तेही भारतात!
Russian- Ukrainian Couple Marriage
Image Credit source: Instagram
रचना भोंडवे

|

Aug 05, 2022 | 5:16 PM

काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh),शांत निसर्गरम्य ठिकाणी एक विलक्षण विवाहसोहळा पार पडला. विवाह बंधनात अडकलेले जोडपे वगळता याबद्दल सर्व काही भारतीय होते. सर्गेई नोविकोव्ह या रशियन मुलाने हिमाचल प्रदेशातील धर्मशाळामध्ये एलोना ब्रामोका या युक्रेनियन (Russian Boy Ukrainian Girl) मुलीशी विवाह (Love Marriage) केला. हा एक प्रेमविवाह होता आणि हे जोडपे रशिया युक्रेन मधले आहे. दोन वेगवेगळ्या आणि शत्रू असणाऱ्या या देशांमधील हे जोडपे एकमेकांच्या प्रेमात बऱ्याच महिन्यांपासून होते. त्यांनी आपल्याच देशांतील युद्धाच्या कोलाहलापासून दूर गाठ बांधण्यासाठी हिमालयातील शांत शहर धर्मशाळा निवडले. या जोडप्याने युद्धा ऐवजी प्रेमाची निवड केली आणि आपल्या देशातील राजकारणाला त्यांचे भवितव्य ठरवू दिले नाही ही एक मोठी कामगिरी आहे.

व्हायरल व्हिडीओ :

दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये…

हिंदू रीतीरिवाजांनुसार लग्नगाठ बांधण्यापूर्वी हे जोडपे दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि गेल्या वर्षभरापासून ते धर्मशाळेत राहत होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, हिमाचल प्रदेशातील स्थानिक विनोद शर्मा आणि त्यांचे कुटुंबीय ‘कन्यादान’सारख्या अनेक विवाह विधींमध्ये सहभागी झाले होते. धर्मशाळेतील इतर परदेशी पर्यटकही या लग्नाला उपस्थित होते. दिव्या आश्रम खरोटा येथे काम करणारे पंडित संदीप शर्मा यांनी म्हटले आहे की, “आमचे पंडित रमण शर्मा यांनी त्यांचे लग्न लावून दिले आणि त्यांना सनातन धर्माच्या परंपरेनुसार विवाहाचे महत्त्व सांगितले.” या जोडप्याने पठण केलेल्या स्तोत्रांचा आणि मंत्रांचा अर्थ समजून घेण्यात रस घेतला, असेही ते म्हणाले.

जिथे प्रेम फुलले ते ठिकाण भारत

त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात या जोडप्याला पारंपारिक हिंदू विवाह पोशाख परिधान केलेले दाखवण्यात आले आहे. दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यात लढत असताना, युक्रेनच्या पूर्वेकडील सीमांपासून दूर, जिथे ही भयंकर लढाई सुरू आहे. त्यांचे प्रेम जिथे फुलले ते ठिकाण भारतात आहे यात काही आश्चर्य नाही. पंडित रमण शर्मा यांनी संस्कृत स्तोत्रांचे पठण करून त्यांचे लग्न लावून दिल्याने स्थानिकांनी या जोडप्याला विधी करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. हे फक्त भारतातच घडते!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें