इंटरनेटवर व्हायरल झाली ‘साडी गर्ल’, सेकंदात पकडते विषारी साप!

व्हिडिओमध्ये पकडलेल्या सापाचे वर्णनही ती साडी गर्ल देत आहे. तसेच, सापाचे रेस्कू करुन ती जंगलात सोडत असल्याचे सांगते. या व्हिडिओला अनेक लाईक अन् कॉमेंट मिळाल्या आहेत. ही रिल जनजागृती आणि माहितीसाठी केल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

इंटरनेटवर व्हायरल झाली साडी गर्ल, सेकंदात पकडते विषारी साप!
साडी गर्ल साप पकडताना
| Updated on: Oct 22, 2024 | 12:53 PM

इंटरनेटवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. त्या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळत आहे. सध्या एका साडी गर्लचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ही साडी गर्ल काही सेंकदात साप पकडताना दिसत आहे. या मुलीचे जितके व्हिडिओ व्हायरल झाले आहे, त्यात तिने साडी परिधान केली आहे. यामुळे तिला साडी गर्ल म्हटले जात आहे.

साडी गर्ल साडी घालूनच अजबगजब कारनामे करत आहे. साडी घालून ती धोकादायक साप काही क्षणात पकडत आहे. विषारी सापांचे रेस्क्यू ती काही सेंकदात करत आहे. ती मुलगी साडीतच विविध प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत असते. मात्र या सगळ्यांमध्ये तिचे साप पकडतानाचे व्हिडिओ सर्वाधिक पाहिले जात आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर कोणालाही धक्का बसेल. कारण या मुलीचे व्हिडिओ खूपच वेगळ्या पद्धतीने बनवला आहे.

ग्लॅमरस स्टाईलमध्ये पकडते साप

साडी गर्लने अनेक साप रेस्क्यू करतानाचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. साप पकडताना तिला कोणतीही भीती वाटत नाही. साडी नेसून अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये तिने आरामात साप पकडले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवलेले सर्व साप धोकादायक दिसत आहेत. तरीही ती अडचणीत असलेल्या ठिकाणी, कधी पलंगाखाली, किंवा कुठेही लपलेल्या ठिकाणी साप शोधून तिला पकडते. तिचे हे व्हिडिओ थक्क करणार आहे.

रिल जनजागृतीसाठी…

व्हिडिओमध्ये पकडलेल्या सापाचे वर्णनही ती साडी गर्ल देत आहे. तसेच, सापाचे रेस्कू करुन ती जंगलात सोडत असल्याचे सांगते. या व्हिडिओला अनेक लाईक अन् कॉमेंट मिळाल्या आहेत. ही रिल जनजागृती आणि माहितीसाठी केल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यामध्ये साप कोणत्या जातीचा आहे, तो कुठे आढळतो, तो किती धोकादायक आहे? ही माहितीसुद्धा दिली आहे.