Video : या माकडाला सुसाट धावताना बघून नेटकरी बोलले हा तर ऑलिम्पिक जिंकेल

या व्हिडिओत पळणारा हा माकड सुपरफास्ट वेगाने सुसाट सुटला आहे. रस्त्याच्या कडेला हा धावत असल्याने कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर हा व्हिडिओ सुपरफास्ट व्हायरल होत आहे.

Video : या माकडाला सुसाट धावताना बघून नेटकरी बोलले हा तर ऑलिम्पिक जिंकेल
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 10:43 PM

मुंबई : माकडांना आपण नेहमी उलटसूलट उड्या मारताना बघितलं आहे. माकडांना सर्वात खोडकर, सर्वात चलाख आणि सर्वात बुद्धीमान प्राणी मानलं जातं. सोशल मीडियावर माकडांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि त्याला लोकांची जास्त पसंतीही मिळते. आता सोशल मीडियावर अशाच एका माकडाची जोरदार चर्चा आहे, याचा तुफानी वेग बघून नेकरीही आवाक झाले आहेत.

माकड सुपरफास्ट धावतोय

या व्हिडिओत पळणारा हा माकड सुपरफास्ट वेगाने सुसाट सुटला आहे. रस्त्याच्या कडेला हा धावत असल्याने कुणीतरी हा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर हा व्हिडिओ सुपरफास्ट व्हायरल होत आहे. काही नेटकऱ्यांनी तर याला हुसेन बोल्टची उपमा दिली आहे. हुसेन बोल्टच्या स्पीडने धावणारा हा माकड ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलही जिंकू शकतो असे अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

तोल जाता जाता बचवला

हा माकड ज्या ठिकाणावरून धावत आहे ते ठिकाण उंचावर आहे. त्यामुळे त्याचा तोडासा जरी तोल गेला असता तर तो थेट दरीत पडला असता, तो धावतोय तो रस्त्याच्या कडेचा कट्टाई अत्यंत अरुंद आहे, त्यामुळे तो खाली पडण्याचा धोका जास्त होता. माकडं कधी दरीत कोसळत नाही, अशा कमेंट अनेक नेटकऱ्यांनी केल्या आहे. आणि जरी तो पडला असता तरी कोणत्याही झाडाला लटकून तो पुन्हा वरती आला असता. माकडाला दोन पायवर एवढ्या वेगाने धावताना पाहून कित्येकजण हैराण राहिले आहेत. इथे तो त्याच्या चारी पायांचा वापर न करता माणसाप्रमाणे दोन पायांवर सुसाट सुटला आहे. त्यामुळे या माकडाला लोक कुतूहलाने पाहत आहेत.

बचतीला विम्याचं कवच: स्टेट बँकेत खाते उघडा, दोन लाखांचा विमा मिळवा!

‘हार्दिक भाई डिलिव्हरी बहुत फास्ट देते हैं’, नताशा स्टॅन्कोविक पुन्हा प्रेग्नेंट का?

एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका, आझाद मैदानात आंदोलनासाठी वेळेची मर्यादा; कर्मचाऱ्यांकडूनही प्रशासनाला सहकार्य