Viral Video : मुलगा मगरीला खाऊ घालत होता खाद्य आणि अचानक…

| Updated on: Jan 28, 2022 | 9:09 AM

मगर (Crocodile) हा सर्वात भयंकर भक्षकांपैकी एक आहे. जर कोणी त्याच्या शक्तिशाली जबड्यात अडकला तर त्याला जिवंत सुटणं कठीण आहे.

Viral Video : मुलगा मगरीला खाऊ घालत होता खाद्य आणि अचानक...
मगर
Follow us on

Crocodile viral video : मगर (Crocodile) हा सर्वात भयंकर भक्षकांपैकी एक आहे. जर कोणी त्याच्या शक्तिशाली जबड्यात अडकला तर त्याला जिवंत सुटणं कठीण आहे. कारण पाण्याच्या दुनियेचा हा ‘राक्षस’ आपल्या तीक्ष्ण दातांनी मिनिटांत कोणाच्याही अंगावर काटा आणतो. त्यामुळे मोकाट जनावरेही या परिसरात जाण्यास टाळाटाळ करतात. आजकाल मगरीशी संबंधित एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. व्हिडिओमध्ये एक मुलगा मगरीला दूध पाजत आहे. पुढच्या क्षणी जे काही झालं ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया(Social Media)वर लोकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. व्हायरल (Viral) झालेला हा व्हिडिओ केवळ 25 सेकंदांचा आहे, मात्र तो पाहिल्यानंतर हृदयाचे ठोके वाढू शकतात.

मुलाची अवस्था होते वाईट

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नदीच्या काठावर असलेल्या झुडपांजवळ एक माणूस मगरीला चारा घालत आहे. पण पुढच्याच क्षणी जे काही घडतं, ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अन्न पकडण्यासाठी मगर आपला मोठा जबडा उघडतो, पण मांस खाताच ती व्यक्तीपर्यंत पोहोचते. मगरीला अगदी जवळून पाहून मुलाचीही अवस्था वाईट होते. मगरीनं मुलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं तुम्ही पाहू शकता, परंतु मुलगा कसा तरी तेथून पळून जाण्यात यशस्वी होतो.

इन्स्टाग्रामवर शेअर
मगरीचा हा आश्चर्यकारक व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर discoversharks नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 18 जानेवारी रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत 8 लाख 78 हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. हा आकडा सातत्यानं वाढत आहे.

यूझर्सच्या कमेंट्स

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूझरनं कमेंट केली, ‘मुलावर झालेला हल्ला पाहून माझीही तब्येत बिघडली’. आणखी एका यूझरनं लिहिलंय, की ‘मैं शर्त लगाता हूं कि ये लड़का अब दोबारा कभी मगरमच्छ को खाना नहीं खिलाएगा.’

आता शाकाहारी फिश फ्रायचा Video होतोय Viral; यूझर्स म्हणतायत, या किंमतीत दोन किलो मासे येतील!

अबब..! 30 फुटांहूनही अधिक उंचीवरून उडी? 82 लांखांपेक्षा जास्त जणांनी पाहिलाय ‘हा’ Video

डोंगराळ रस्त्यावर अडकला ट्रक, पुढे काय होतं? Video सोशल मीडियावर Viral