AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | नाग नदीत मगरीचा वावर? मगर असल्याचे व्हिडिओ व्हायरल

पिल्लांचा शोध घेतला असता त्यातील 3 पिल्लं मृतावस्थेत आढळली. मात्र इतर पिल्लांचा शोध लागला नाही. त्यामुळं त्यातील तर हे नाही ना अशी शक्यता वर्तविली जात असल्याचं महाराजबागचे क्युरेटर डॉ. सुनील बावस्कर यांनी सांगितलं.

Nagpur | नाग नदीत मगरीचा वावर? मगर असल्याचे व्हिडिओ व्हायरल
magar
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 7:01 AM
Share

नागपूर : मगरीचा (crocodile) वावर असल्यानं रोज दुपारी नागनदीच्या काठावर बघ्यांची गर्दी होत आहे. मगर असल्याचे अनेक व्हिडिओ, मिम्स वायरल होत आहेत. कधी धरमपेठ भागात, कधी मोक्षधाम परिसरात तर कधी धंतोली भागात. मात्र मगर खरच एवढ्या साऱ्या भागात दिसत आहे की फक्त चर्चा आहे.

शेकडो नजरा शोधतात मगरीला

नागपूर शहराचा नामकरण नागनदी वरूनच करण्यात आलं आहे. एका काळात पवित्र असेल नागनदी आज नाला बनून शहराच्या मध्यातून वाहते. त्यामुळं लोकांच्या दुर्लक्षात गेलेल्या नागनदीला मात्र सध्या महत्त्व आलं आहे. रोज दुपारच्या वेळी नागनदीच्या काठावर शेकडो नजरा मगरीचा शोध घेत असल्याचं चित्र पाहायला मिळते. नागनदीत मगर असल्याचे अनेक व्हिडिओदेखील व्हायरल झाले आहेत. त्यामुळं मगर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. नागपूर शहरात कुठलीही मोठी नदी नाही. ज्यातून मगरीसारखा सरपटणारा प्राणी नागपूरमध्ये येईल. त्यामुळं ही मगर खरच असेल तर ती शहरात आली कशी हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे.

मगरीच्या पिल्लांपैकी एखादी असावी

नागपूरला पाणीपुरवठा मध्य प्रदेशमधून येणाऱ्या पेंच नदीतून होतो. मोठ्या पाईपच्या माध्यमातून हे पाणी शहरात आणलं जातं. पेंच नदीत मगर मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळं शहरात मगर या मार्गाने आल्याची शक्यता ही वर्तविली जात आहे. तर दुसरी शक्यता म्हणजे नागपूरमधील ऐतिहासिक प्राणिसंग्रहालय असलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालय. काही वर्षांपूर्वी दोन मगरी वर्धा जिल्ह्यातून इथे आणल्या होत्या. पुढे मगरीने 8 ते 10 पिल्लांना जन्म दिला. मात्र एकदा झालेल्या मुसळधार पावसाने छोटी पिल्लं पिंजऱ्यातून पाण्यासोबत वाहत गेली. पिल्लांचा शोध घेतला असता त्यातील 3 पिल्लं मृतावस्थेत आढळली. मात्र इतर पिल्लांचा शोध लागला नाही. त्यामुळं त्यातील तर हे नाही ना अशी शक्यता वर्तविली जात असल्याचं महाराजबागचे क्युरेटर डॉ. सुनील बावस्कर यांनी सांगितलं.

मगरीला पोषक वातावरण नाही

नागनदी प्रदूषित असून ती नावापुरती नदी आहे. तिला सध्या नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यामुळं दूषित पाणी त्यातील कचरा घाण यामुळे मगरीला पोषक वातावरण नाही. मगर या पाण्यात जीवंत राहील यावर अभ्यासक शासंक आहेत. मात्र नाल्यातील जनावर आणि काही भागात असलेल्या साफ पाणी यामुळे मगर काही काळ नाग नदीत वास्तव्य करू शकते. मात्र ती नाग नदीत असताना तिने नदीच्या बाहेर निघून मानवी वस्तीत घुसण्याचा प्रयत्न केला तर तो एक तर मानवाच्या किंवा मगरीचा जीवावर उठू शकतो.

Nagpur Crime : नागपूर गुन्हे शाखेनं जप्त केली तब्बल दीड कोटी रुपयांची सडकी सुपारी!

ZP Election Bhandara-Gondia | झेडपीची मतमोजणी 19 जानेवारीला, ओबीसींच्या जागा अनारक्षित, 18 जानेवारीला मतदान

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.