AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : नागपूर गुन्हे शाखेनं जप्त केली तब्बल दीड कोटी रुपयांची सडकी सुपारी!

नागपूर (Nagpur) सडक्या सुपारी(Betel Nut)च्या तस्करीचं केंद्र बनत चाललं आहे. याप्रकरणी पोलिसां(Police)नी ट्रक जप्त केलाय.

Nagpur Crime : नागपूर गुन्हे शाखेनं जप्त केली तब्बल दीड कोटी रुपयांची सडकी सुपारी!
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 3:33 PM
Share

नागपूर : देशातलं मध्यवर्ती असलेलं नागपूर (Nagpur) सडक्या सुपारी(Betel Nut)च्या तस्करीचं केंद्र बनत चाललं आहे. नागपुरातून मोठ्या प्रमाणात सुपारीचा व्यापार होतो. मात्र त्या आडून सडक्या सुपारीचीसुद्धा आवक केली जातेय. याप्रकरणी पोलिसां(Police)नी ट्रक जप्त केलाय.

पोलिसांना गुप्त माहिती गुन्हे शाखा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, की ट्रान्सपोर्ट प्लाझामध्ये सडक्या सुपरीचा एक ट्रक येणार आहे. पोलिसांनी सापळा रचत ट्रक पकडला आणि ताब्यात घेतला असता त्या ट्रॅकमध्ये सुपारी होती, मात्र त्याची वाहतूक वेगळ्याच मालाची होती. हा ट्रॅक जप्त करण्यात आला. यात जवळपास 80 लाख रुपये किंमतीची सुपारी होती.

60 लाख रुपये किंमतीची पोलिसांना आणखी एका गोडाऊनमध्ये अश्याच प्रकारे सुपारी असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली असता 60 लाख रुपये किमतीची सुपारी मिळून आली. याची संपूर्ण माहिती अन्न औषध प्रशासन विभागा(Food and Drug Administration)ला देण्यात आली असून त्यांच्या स्वाधीन हा माल करण्यात आला. यात आणखी मोठे तार जुळले असल्याचा अंदाज पोलिसांना आहे.

अनेक मोठे मासे? सडक्या सुपारीचा मोठा गोरखधंदा नागपुरातून चालत असून, यात अनेक मोठे मासे असल्याचं समोर येत आहे. मात्र पोलिसांनी आता यांच्या बुडाशी जाऊन तपास करण्याची गरज आहे.

अनेकदा कारवाई

तीन वर्षांपूर्वी ट्रान्सपोर्ट प्लाझा परिसरात अनुप नगरियाची सुपारी पकडली होती. जप्त करण्यात आलेली सुपारी एका व्यापाऱ्यासाठी बोलावण्यात आली होती. या व्यापाऱ्याविरुद्ध अनेकदा कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यातही चेन्नई येथे मोठ्या प्रमाणात सुपारी आली होती. त्यातील काही सुपारी नागपूरला आली आहे. याप्रकरणी तपास केल्यास मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

VIDEO | मोबाईल चोरांचं धाडस वाढलं, बाईकस्वारांनी भररस्त्यात तिला 150 मीटर फरफटत नेलं

Vaccination: बोगस प्रमाणपत्र देणारे आणखी एक रॅकेट औरंगाबादेत उघड, ओम्नी व्हॅनमध्ये फसवेगिरीचा कारखाना!

Aurangabad Suicide | स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.