सिद्धार्थच्या निधनानंतर चाहत्यांवर शोककळा, #sidnazz हॅशटॅगखाली शहनाजसोबतचे व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर #sidnazz हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंडिंगवर आहे. या हॅशटॅगच्या मदतीने सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि अभिनेत्री शहनाज गिल यांचे जुने व्हिडीओ, फोटो शेअर केले जात आहेत.

सिद्धार्थच्या निधनानंतर चाहत्यांवर शोककळा, #sidnazz हॅशटॅगखाली शहनाजसोबतचे व्हिडीओ व्हायरल
SIDHARTH AND SHEHNAAZ GILL
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 6:31 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. वयाच्या 40 व्या वर्षी सिद्धार्थचे निधन झाले. सिद्धार्थच्या अकाली निधनानंतर आता त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये त्याचे काही जुने व्हिडीओदेखील आहेत. सध्या सोशल मीडियावर #sidnazz हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंडिंगवर आहे. या हॅशटॅगच्या मदतीने सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि अभिनेत्री शहनाज गिल यांचे जुने व्हिडीओ, फोटो शेअर केले जात आहेत. (sidharth shukla passed away people sharing heartbreaking posts of siddharth and shehnaz gill on social media)

#sidnazz हॅशटॅग ट्रेंडिंगवर

सिद्धार्थ आणि शहनाज या जोडीला यापूर्वी अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केलं गेलं होतं. या जोडीविषयी अनेक चर्चा समोर आलेल्या आहेत. सध्या ट्विटर आणि फेसबुकवर तर #sidnazz हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे. या हॅशटॅगखाली वेगवेगळे फोटो शेअर केले जात आहेत. सध्या blossom या ट्विटर अकाऊंटवर एक जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ शहनाजसोबत मस्ती तसेच डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय़ ठरला आहे.

सिद्धार्थ शहनाजसोबत मस्ती, डान्स करतोय

व्हिडीओ शेअर करताना हृदय पिळवटून टाकणारे कॅप्शन देण्यात आले आहे. जेव्हा एखादी कहानी अपूर्ण राहते तेव्हा खूप दु:ख होतं. पण सध्या पुस्तक बंद झालं आहे,” असं कॅप्शनमध्ये म्हटलंय. या व्हिडीओमध्ये शहनाज तसेच सिद्धार्थ मस्ती करताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी हे दोघे डान्स करत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून त्याचे चाहते भावूक झाले आहेत.

पाहा व्हिडीओ :

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली 

सिद्धार्थच्या निधनांतर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. अक्षय कुमार, सलमान खान अशा बड्या अभिनेत्यांनी सिद्धार्थच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलंय. #sidnazz या हॅशटॅगसोबतच #RestInPeace #OmShanti #sidhearts हे हॅशटॅगसुद्धा सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगवर आहेत.

इतर बातम्या :

Video | सिद्धार्थचा जुना व्हिडीओ व्हायरल, म्हणतो “आयुष्य खूप मोठं आहे, पुन्हा भेटू”, चाहते भावूक

अबब! 2000 रुपयांचा वडापाव; सोन्याचा वर्ख, चीज स्टफिंग, सारा थाटच न्यारा

PHOTO: हे देसी जुगाड पाहून तुम्ही थक्कच व्हाल

(sidharth shukla passed away people sharing heartbreaking posts of siddharth and shehnaz gill on social media)