Video: दिलजीत दोसांझच्या गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

Dance | सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, डान्स करताना आजोबांच्या अंगात सळसळून उर्जा वाहत आहे. त्यांची पत्नीही त्यांना तितक्याच उत्साहाने साथ देत आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

Video: दिलजीत दोसांझच्या गाण्यावर आजोबांचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
डान्स

मुंबई: आयुष्यात एकदा आनंदाने जगायचं ठरवलं की मग वय, पैसा-अडका आणि इतर भौतिक सुखं या गोष्टी गौण ठरतात. अगदी उतारवयातही अनेक लोक जीवनाचा आनंद भरभरून लुटतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एक आजोबा बॉलीवूड चित्रपटातील गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. (Viral Video of elderly couple dancing goes viral on Social Media)

नेमकं काय आहे व्हीडिओत?

या व्हीडिओत दिसणारे आजोबा साधारण 75-80 इतक्या वयाचे आहेत. आजोबांनी दिलजित दोसांझच्या ‘व्हाईब तेरी-मेरी मैच करती’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. या वयातही आजोबांचा उत्साह थक्क करणारा आहे. आजोबा संपूर्ण घरात फिरून डान्स करत आहेत. एरवी सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. परंतु, डान्स करताना आजोबांच्या अंगात सळसळून उर्जा वाहत आहे. त्यांची पत्नीही त्यांना तितक्याच उत्साहाने साथ देत आहे. सोशल मीडियावर हा व्हीडिओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @mr._and_mrs._verma

व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. mr._and_mrs._verma या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे. विशेष म्हणजे mr._and_mrs._verma हे पेज या आजोबांनीच तयार केले आहे. या पेजवरुन वर्मा दाम्पत्य त्यांच्या डान्सचे अनेक व्हीडिओ शेअर करत असतात.

शाहरुख-दीपिकाला टक्कर, आज्जीबाईंचा लुंगी डान्स

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एका आजीबाईंचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओमध्ये एक साधारण सत्तरीच्या वयातील आजीबाई नाचताना दिसत आहेत. ‘थलायवा’ या बॉलिवूडच्या गाण्यावरील आजीबाईंचा डान्स अगदी थक्क करायला लावणार आहे. एवढे वय होऊनही आजीबाई अलीकडच्या बॉलिवूड चित्रपटांतील डान्स स्टेप्स सहजनेते करताना दिसत आहेत.

हा व्हीडिओ घरात शूट करण्यात आला असून यामध्ये आजीबाईंचा नातूही त्यांच्यासोबत नाचताना दिसत आहे. एकूणच संपूर्ण घर आजीबाईंच्या नृत्याचा आनंद लुटताना दिसत आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आजीबाई कुठेही थकलेल्या दिसत नाहीत. संपूर्ण व्हीडिओत त्या एक सो एक डान्स स्टेप्स सादर करताना दिसतात. सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत.

संबंधित बातम्या:

Video | भर रस्त्यात राग अनावर, म्हाताऱ्या आजोबांचा तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

VIDEO: अमेरिकन डान्सर पत्नीसोबत बॉलीवूडच्या ‘छम्मक छल्लो’ गाण्यावर थिरकतो तेव्हा….

VIDEO: शाहरुख-दीपिकाला टक्कर, आज्जीबाईंचा लुंगी डान्स, लुंगी डान्स, एकदम स्टेज तोड परफॉर्मन्स

Viral Video of elderly couple dancing goes viral on Social Media

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI