इथे चलन म्हणून वापरला जातो दगड! 21व्या शतकात सुद्धा वाईट अवस्था

| Updated on: Jan 27, 2023 | 1:54 PM

इथे दगड देऊन वस्तूंची खरेदी-विक्री केली जाते. सध्या सोशल मीडियावर दगडी चलनाची खूप चर्चा होत आहे. इथे कागदी नोटा चालत नाहीत, नाणीही चालत नाहीत.

इथे चलन म्हणून वापरला जातो दगड! 21व्या शतकात सुद्धा वाईट अवस्था
yap island
Follow us on

वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी पैशांचे व्यवहार अनेक वर्षांपूर्वी सुरू झाले. आज जगातील जवळजवळ प्रत्येक देशाचे स्वतःचे चलन आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगात एक अशी जागा आहे जिथे दगडी चलन आहे. इथे दगड देऊन वस्तूंची खरेदी-विक्री केली जाते. सध्या सोशल मीडियावर दगडी चलनाची खूप चर्चा होत आहे. इथे कागदी नोटा चालत नाहीत, नाणीही चालत नाहीत. इथले लोक चलन म्हणून दगडांचा वापर करतात. जाणून घेऊयात असं कोणतं अनोखं ठिकाण आहे हे…

जेव्हा जगात चलन पद्धती नव्हती तेव्हा तेव्हा लोक वस्तू खरेदी करण्यासाठी बार्टर प्रणालीचा वापर करत असत. ही पद्धत म्हणजेच वस्तुविनिमय पद्धत. या पद्धतीत वस्तूंच्या बदल्यात वस्तू दिल्या जातात. या देवाणघेवाण मध्ये समान मूल्याचा माल दिला जात असे. कुणाला बकरी विकत घ्यायची असेल तर त्या बदल्यात मेंढ्या किंवा इतर गोष्टी द्याव्या लागत असत.

आता असं कोणतं ठिकाण आहे जिथे दगडी चलन आहे? यप बेटावर अजूनही दगडी चलन चालते. प्रशांत महासागरात यप बेट आहे. एकीकडे जिथे माणूस चंद्रावर पोहोचला आहे, तिथे दुसरीकडे यप बेटावर अजूनही दगडी चलन चालते. कमाल आहे ना?

विशेष म्हणजे यप बेटावर लहान ते मोठे दगड चलनाच्या स्वरूपात चालतात. मिळालेल्या माहितीनुसार, यप आयलंड सुमारे 100 स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. इथे सुमारे 12 हजार लोक राहतात.

यप बेटावर बरीच छोटी गावे आहेत. इथे प्रत्येक कुटुंबाकडे दगडाच्या स्वरूपात चलन असते. त्या दगडावर कुटुंबाचे नावही लिहिलेले आहे.

चलन समजल्या जाणाऱ्या या दगडांच्या मध्ये एक छिद्र आहे. दगड जितका जड असेल तितकी त्याची किंमत जास्त असते. जास्त आणि जड दगड असलेली कुटुंबे इथे श्रीमंत मानली जातात.

या दगडी चलनाचा उगम कसा आणि केव्हा झाला याचा पुरावा उपलब्ध नाही. परंतु असे मानले जाते की दगडी चलन वापरण्यामागील कारण यप बेटावर कोणताही मौल्यवान कच्चा माल किंवा धातू नसणे आहे. इथे सोनं किंवा कोळसा नाही. शतकानुशतके येथे चुनखडीचा चलन म्हणून वापर केला जात आहे.