‘भगवान कहां है रे तु’, परीक्षेला विद्यार्थ्याने लिहिलं अमीर खानच्या या चित्रपटातील गाणं, शिक्षिका म्हणाली…

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये एक उत्तरपत्रिका दिसत आहे. विशेष म्हणजे उत्तर पत्रिकेत प्रश्नाच्या उत्तराशिवाय अमीर खानचं एक गाण लिहिण्यात आलं आहे.

भगवान कहां है रे तु, परीक्षेला विद्यार्थ्याने लिहिलं अमीर खानच्या या चित्रपटातील गाणं, शिक्षिका म्हणाली...
STUDENT ANSWER SHEET VIRAL
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 04, 2023 | 3:07 PM

मुंबई : परीक्षेच्या (EXAM) दरम्यान उत्तर पत्रिका (ANSWER SHEET) खाली ठेवणे किंवा चुकीचं उत्तर दिल्याचं पाहायला मिळत. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हि़डीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये प्रश्नांची उत्तर गाणी लिहिली आहेत. चंढीगढ विश्वविद्यालयातील एका विद्यार्थ्यांने (STUDENT ANSWER SHEET VIRAL) गाणी लिहिली असल्यामुळे त्याची उत्तरपत्रिका व्हायरल झाली आहे. विद्यार्थ्यांने त्या उत्तरपत्रिकेत फक्त तीन प्रश्नांची उत्तर लिहीली आहेत. बाकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याने अमिर खानच्या चित्रपटांची गाणी लिहिली आहेत.

विद्यार्थ्याने परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं थ्री इडियट्स या प्रचंड गाजलेल्या चित्रपटातील गाणी लिहिली आहेत. गिव मी सम सनशाइन, गिव मी सम रेन, गिव मी अदर चान्स, आई वन्नो ग्रो अप वन्स अगेन हे गाणं लिहिलं आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना विद्यार्थ्याने लिहीले की, मॅडम, तुम्ही एक चांगल्या शिक्षिका आहात. ही माझी चुकी आहे की, मी मेहनत नाही करु शकलो. देवा, मला बुद्धी दे.

तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना, विद्यार्थ्याने अमीर खानच्या पीके चित्रपटातील गाणं लिहीलं आहे. ‘भगवान कहां है रे तु’. विद्यार्थ्यांची ही उत्तर पत्रिका सोशल मीडियावर चांगलीचं व्हायरल झाली आहे.

विशेष म्हणजे, शिक्षिकेने विद्यार्थ्यांला मार्क देताना ही क्रिएटीव्हिटी दाखवली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तरात लिहीलं आहे की, तु अजून काही प्रश्नांची उत्तरं गाण्यांमध्ये लिहीली पाहिजे होती. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एका नेटकऱ्याने शिक्षिकेला आयडीया दिली आहे. तुम्हाला सुध्दा गाण्याच्या भाषेत उत्तर द्यायला हवं. दुसऱ्या नेटकऱ्याने स्टुडंटस एक वर्षभर काय केलंस, तुला उत्तर पत्रिकेत गाणी लिहीण्याची वेळ आली आहे.