भयानक व्हिडीओ! ‘जाको राखे साइयां मार सके ना कोय’ 

| Updated on: Dec 07, 2022 | 5:46 PM

भारतात ‘जाको राखे साइयां मार सके ना कोय’ ही एक प्रसिद्ध म्हण आहे.

भयानक व्हिडीओ! ‘जाको राखे साइयां मार सके ना कोय’ 
railway station viral video
Image Credit source: Social Media
Follow us on

भारतात ‘जाको राखे साइयां मार सके ना कोय’ ही एक प्रसिद्ध म्हण आहे. एक विद्यार्थीनी ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये वाईट प्रकारे अडकली. विद्यार्थिनीला पाहून तिला वाचवता येईल असं वाटलं नव्हतं, पण तिथे उपस्थित असलेल्या लोकांमुळे आणि आरपीएफमुळे एक मोठी घटना वेळीच टळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून लोक सैनिकांचं जोरदार कौतुक करत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ राणी कमलापती स्टेशनमधील आहे. रेल्वे क्रमांक १२९७५ म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडू लागली, तेव्हा येथे उतरण्याच्या प्रयत्नात एक विद्यार्थिनी पडली आणि ती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधोमध चांगलीच अडकली.

उपस्थित असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल इंदर यादव आणि जीआरपीचे कॉन्स्टेबल विक्रम यांनी सतर्कता दाखवत मुलीची सुटका केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

विद्यार्थिनी आपल्या कुटुंबाला सोडायला स्टेशनवर आली होती पण ती ट्रेनच्या आत गेली आणि ट्रेन धावू लागल्यावर विद्यार्थी खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागली आणि दरम्यान तिचा पाय घसरल्याने ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकते. या धक्कादायक व्हिडिओतील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे विद्यार्थिनीला फारशी दुखापत झाली नाही.

आरपीएफ अशाच प्रकारच्या घटनांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी ओळखले जाते. अशा दुर्घटनांमधून सतर्क आरपीएफ कॉन्स्टेबलनी लोकांची सुटका केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

हा व्हिडिओ @jsuryareddy नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला शेकडो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.