Swami Chaitanyananda: अश्लील चॅट, घाणेरडे स्क्रीनशॉट आणि विद्यार्थीनींचे प्रायवेट… चैतन्यानंदच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडले?

Swami Chaitanyananda: स्वामी चैतन्यानंदला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्याने पोलिसांना मोबाईलचा पासवर्ड देण्यास नकार दिला होता. पण पोलिसांनी त्याचा फोन अनलॉक केला असून त्यामध्ये काय काय सापडले हे सांगितले आहे.

Swami Chaitanyananda: अश्लील चॅट, घाणेरडे स्क्रीनशॉट आणि विद्यार्थीनींचे प्रायवेट... चैतन्यानंदच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडले?
Swami Chaitanyananda
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 30, 2025 | 1:34 PM

दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला अटक केल्यानंतर आता मोठी माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या हाती आता नवे पुरावे लागले आहेत. तपासात असे समोर आले आहे की, चैतन्यानंदच्या फोनमधून अनेक धक्कादायक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी त्याच्याविरुद्धचे पुरावे आहेत. आरोपीवर दिल्लीतील वसंत कुंज येथील एका खासगी संस्थेत 17 महिला विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ आणि पैशांचा गैरव्यवहार केल्याचे गंभीर आरोप आहेत. आता स्वामीच्या फोनमध्ये नेमकं काय सापडले चला जाणून घेऊया…

फोनमध्ये अश्लील चॅट्स आणि महिलांचे फोटो

खरंतर, पोलिसांनी चैतन्यानंदच्या फोनमधून अनेक महिलांसोबत केलेल्या अश्लील चॅट्स, स्क्रीनशॉट्स आणि त्यांच्या प्रोफाइल फोटो जप्त केले आहेत. यामुळे हे स्पष्ट होते की, आरोपी अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना अश्लील संदेश पाठवत होता आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. तपासकर्त्यांचे म्हणणे आहे की, या गोष्टी लैंगिक छळ आणि धमक्यांच्या आरोपांना बळकटी देतात.

वाचा: नणंदेसोबत बायकोचे रोमँटिक चॅट, नवऱ्याला समजताच… 7 वर्षांचे नात्यात नको ते घडलं

दोन महिला सहाय्यकही अटकेत

स्वामी चैतन्यानंदला आग्रा येथील ताजगंजमधील हॉटेल फर्स्ट येथून अटक करण्यात आले होते आणि त्याला दिल्लीतील वसंत कुंज पोलीस स्टेशनला आणण्यात आले. येथील न्यायालयाने त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी तपासात सहकार्य करत नाही आणि कथितपणे तपासकर्त्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय, चैतन्यानंदच्या दोन महिला सहाय्यकांनाही अटक करण्यात आली आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या दोघींनी चैतन्यानंदच्या अनेक काळ्या कृत्यांमध्ये सहकार्य केले आहे.

स्वतःला सांगायचा यूएनचा कायमस्वरूपी राजदूत

चैतन्यानंदवर केवळ लैंगिक छळच नव्हे, तर आर्थिक फसवणुकीचेही आरोप आहेत. तपासात असे समोर आले आहे की, त्याने पळून गेल्यानंतर सुमारे 60 लाख रुपये काढले आणि एकूण 30 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार केला. याशिवाय, त्याच्याकडे असलेले दोन बनावट व्हिजिटिंग कार्ड्सही जप्त करण्यात आली आहेत. एकामध्ये तो स्वतःला यूएनचा कायमस्वरूपी राजदूत सांगत होता, तर दुसऱ्यामध्ये तो ब्रिक्सचा भारतीय विशेष दूत असल्याचे सांगत होता.