नणंदेसोबत बायकोचे रोमँटिक चॅट, नवऱ्याला समजताच… 7 वर्षांचे नात्यात नको ते घडलं
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. नवऱ्याने बायकोच्या मोबाईलमध्ये नणंदेसोबतचे रोमँटिक चॅट पाहिले. त्यानंतर जे घडलं पोलिसांनाही धक्का बसला. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया..

‘साहेब, माझ्या पत्नीला माझ्या बहिणीने पळवून नेलं आहे. त्या दोघींमध्ये खूप जवळीक वाढली होती. त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मला शंका आहे की पत्नीला गायब करण्यात माझ्या बहिणीचाच हात आहे. जरी मानसी घरी परतली असली, तरी संध्याचा अजूनही काहीच पत्ता लागला नाही…’ हे प्रकरण एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी वाटत नाही. पण ही वास्तविकता आहे. एक नवरा, त्याची बायको आणि बहिणीच्या नात्यांमधील गुंतागुंतीमध्ये अडकला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकले आहे.
पती-पत्नीने केलं होतं प्रेमविवाह
खरंतर, मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील मैहर, अमरपाटन येथील 30 वर्षीय आशुतोष बंसल याने सात वर्षांपूर्वी आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलीशी, संध्यासोबत, प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर या जोडप्याला एक मुलगाही झाला. सुरुवातीला कुटुंबीय या नात्याच् विरोधात होते. पण हळूहळू सर्वांनी हे नाते स्विकारले. 2022 मध्ये आशुतोष अभ्यासासाठी संध्या आणि मुलाला घेऊन जबलपूरला आला. तो येथे एका खासगी महाविद्यालयातून डी.एड. करत होता.
वाचा: आग्राचे हॉटेल फर्स्ट, रुम 101, रात्रीचे 3.30… स्वामींचे काळे कृत्य उघड, नेमकं काय घडलं?
नणंदेसोबत फिरायला जायची वहिनी
जबलपूरमध्ये राहत असताना आशुतोषची मानलेली बहीण मानसी वारंवार त्याच्या घरी यायची-जायची. मानसी आणि संध्या यांच्यात नणंद-वहिनीते नाते होते. त्यांच्याच खूप चांगली मैत्री झाली होती. त्या दोघी एकत्र फिरायला जायच्या आणि एकत्र बाहेर जायला लागल्या होत्या. आशुतोषला कधीच शंका आली नाही की त्यांची जवळीक मैत्रीपलीकडेही जाऊ शकते. 13 ऑगस्टच्या सकाळी संध्या अचानक घरातून न सांगता निघून गेली.
पतीने तिला दिवसभर शोधलं, पण काहीच माहिती मिळाली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती रांझी परिसरात जाताना दिसली. आशुतोषला वाटलं की ती बहिणी मानसीसोबत आहे. दुसऱ्या दिवशी तो रेल्वे स्टेशनवरही गेला, जिथे संध्या होती. विचारल्यावर संध्याने स्पष्ट उत्तर दिलं नाही आणि फक्त अमरपाटनला जाण्याचा हट्ट केला. आशुतोष तिला आणि मुलाला घेऊन घरी परतला. काही दिवस सर्व काही सामान्य राहिलं, पण 22 ऑगस्टला संध्या अचानक मोबाइल सोडून पुन्हा गायब झाली. यानंतर पतीने तिचा मोबाइल तपासला तेव्हा पत्नी आणि बहिणीच्या व्हॉट्सअॅप चॅट पाहून तो थक्क झाला. त्यात दोघींनी एकत्र राहण्याची योजना आखली होती. संध्याच्या गायब होण्याची तक्रार आशुतोषने अमरपाटन आणि जबलपूरच्या घमापूर पोलिस ठाण्यात नोंदवली. पोलिसांनी मोबाइल लोकेशन आणि चॅट रेकॉर्ड तपासले. विचारपूस केल्यावर मानसीने कोणतीही ठोस माहिती दिली नाही.
ASP ने दिली प्रकरणाची माहिती
या संपूर्ण प्रकरणात अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूर्यकांत शर्मा यांनी सांगितलं की, जबलपूर आणि मैहरचे पोलिस महिलेचा शोध घेत आहेत. सध्या हे स्पष्ट नाही की संध्या स्वतःच्या मर्जीने गेली आहे की तिच्यासोबत काही अनुचित घडलं आहे. आशुतोषचं म्हणणं आहे की, त्याच्या पत्नी आणि बहिणीमधील जवळीक धोकादायक पातळीपर्यंत वाढली होती. दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याला शंका आहे की पत्नीला गायब करण्यात बहिणीचा हात आहे. जरी मानसी घरी परतली असली, तरी संध्याचा अजूनही काहीच पत्ता लागला नाही, पण या घटनेची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा आहे.
