टूथब्रशवरुन शोधून काढलं पत्नीचं सिक्रेट अफेअर, 15 लाख, केस जिंकला पण एक अशी चूक केली त्यामुळे उलट तोच गेला तुरुंगात

तैवानमध्ये एका पतीने पत्नीचे अफेअर उघड केले. सादर केलेल्या पुराव्यामुळे त्याला 15 लाख रुपये मिळाले, पण एका चुकीमुळे त्यालाच तुरुंगवास आणि दंड भोगावा लागला.

टूथब्रशवरुन शोधून काढलं पत्नीचं सिक्रेट अफेअर, 15 लाख, केस जिंकला पण एक अशी चूक केली त्यामुळे उलट तोच गेला तुरुंगात
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Aug 28, 2026 | 5:53 PM

आजकालचं जग एकदम फास्ट झालंय आणि त्याला जोड मिळाली आहे ती प्रगत तंत्रज्ञानाची. पण प्रत्येक गोष्टीचे जसे फयदे असतात तसेच काही तोटेही असतात. टेक्नॉलॉजी ही माणसासाठी कितीही उपयुक्त असली , तरी कधी कधी त्यामुळे अडचणीतही सापडायची वेळ येऊ शकते. तैवानमधील अशीच एक घटना आता समोर आली आहे, ज्याबद्दल वाचून तुम्ही हैराणच व्हाल. तिथे एका इसमाचा त्याच्या पत्नीने विश्वासघात केला, त्याने रोबोट व्हॅक्युम क्लीनरच्या मदतीने तिचं अफेअर तर शोधून काढलं, वर 15 लाख रुपयेही तो जिंकला पण… त्याच्या एका चुकीमुळे त्यालाच शिक्षा भोगावी लागली. गॅझेटचा चुकीचा वापर करण्याच्या नादात त्यालाच तुरुंगाची हवा खावी लागली ना राव !

नेमक काय घडलं ?

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, खरंतर ही घटना 2023 सालची आहे. तैवानमध्ये राहणाऱ्या या माणसाला, त्याच्या हॉलिडे होममध्ये एक असा टूथब्रश सापडला, जो दुसराच व्यक्ती वापरत होता. त्यामुळे त्याला संशय आला आणि त्याने गॅरेजमध्ये असलेल्या सीसीटीव्हीचं फुटेज चेक केलं. एक अनोळखी व्यक्ती त्याच्या पत्नीला सोडायला आल्याचं त्याला त्यावरून समजलं.

पत्नी विश्वासघात करत असल्याचा त्याला संशय आला, मात्र याच गोष्टीची त्याला खात्री करून घ्यायची होती. आपल्या पत्नीशी बोलता यावं यासाठी त्याने त्याच्या घरातील रोबोट व्हॅक्युम क्लीनर,हा फोनच्या सहाय्याने सुरू केला. मात्र लाईव्ह फीड सुरू होताच, त्याचे डोळे विस्फारले, कारण व्हॅक्युम क्लीनरच्या कॅमेऱ्यात त्याला दिसलं की त्याची पत्नी आणइ तिचा प्रेमी आक्षेपार्ह अवस्थेत एकमेकांसोबत आहेत.

कोर्टात सादर केला पुरावा पण

यानंतर त्या इसमाने पत्नीने दिलेल्या धोक्याचा पुरावा म्हणून हा व्हिडीओ कोर्टात सादर केला. कोर्टानेही ते मान्य करत पत्नी आणि तिच्या प्रियकराला 15 लाखांचा दंड ठोठावला. याप्रकरणात पतीने केस जिंकली आणि त्याला पैसेही मिळाले.

मात्र यानंतरच खरा खेळ सुरू झाला. त्या इसमाच्या पत्नीने आपल्याच पतीवर पलटवार केला. तिच्या संमतीशिवाय आपला प्रायव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप करत त्या महिलेने तिच्या पतीवरच केस केली. तैवानच्या कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीच्या खासगी क्षणांचे गुपचूप रेकॉर्डिंग करणं हा गंभीर गुन्हा आहे. आणि पती-पत्नीचे नाते असलं, तरी असं करण्यासाठी कोणालाही परवानगी मिळत नाही.

याचाच आधार घेत महिलेने पतीला कोर्टात खेचलं. त्यानंतर न्यायालयाने पतीचे युक्तिवाद फेटाळून लावले. त्यामुळे 15 लाख रुपये जिंकल्यानंतरही, रोबोट व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने लपून व्हिडिओ बनवल्याच्या गुन्ह्यात त्या बिचाऱ्या पतीला 5 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा आणि साडेचार लाख रुपयांचा दंड भोगावा लागला. अर्थात, पुरावे गोळा करण्याची ही पद्धत त्याला चांगलीच महागात पडली आणि डाव त्याच्यावरच उलटला.

Follow Us