AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

260 वर्ष जुना रस्ता पापणी लवताच नेस्तनाबूत… महापुराने नेपाळची लाइफलाइनच केली उद्ध्वस्त

नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुराने मोठी हानी केली आहे. या संकटात शेकडो लोकांचा बळी गेला असून हजारो बेपत्ता आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे २६० वर्षांपूर्वीचा, नेपाळला तिबेटशी जोडणारा महत्त्वपूर्ण रासुवागढी-केरुंग व्यापारी मार्ग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. नेपाळची ही जीवनरेषा तुटल्याने, दोन्ही देशांमधील व्यापार आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.

260 वर्ष जुना रस्ता पापणी लवताच नेस्तनाबूत... महापुराने नेपाळची लाइफलाइनच केली उद्ध्वस्त
Nepal Flood CrisisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2026 | 5:54 PM
Share

नेपाळवर पुन्हा एकदा शतकातील सर्वात मोठं म्हणावं इतकं मोठं संकट आलं आहे. कोणताही पाऊस नसताना नेपाळमध्ये अचानक महापूर आला आणि गावंच्या गावं वाहून गेली. शेतीवाडी, जानवरं आणि माणसंही वाहून गेली आहेत. आतापर्यंत साडेपाचशेच्यावर लोकांचा या महापुरात मृत्यू झाला आहे. 1500 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. सर्वत्र हाहा:कार उडाला आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क नाहीये. तिसरा दिवस उजाडला तरीही अनेक गावं अंधारात आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि कंठात हुंदका आहे. या महापुरात सर्व काही वाहून गेलंय. इथला एक सर्ववात जुना रस्ताही वाहून गेलाय. त्यामुळे नेपाळची लाइफलाइनही तुटली आहे.

26 ऑगस्ट रोजी आलेल्या महापुरात रासुवागढी-केरुंग मार्ग पूर्णपणे नेस्तनाबूत झाला आहे. नेपाळचा हा सर्वात जुना म्हणजे 260 वर्ष जुना मार्ग आहे. नेपाळला तिबेटशी जोडणारा हा हिमालयातून जाणारा मार्ग होता. हा रस्ताच आता तुटला आहे. सामानांची नेआण आणि लोकांच्या वर्दळीचा हा मुख्य मार्ग होता. दोन देशांमधील हा पारंपारिक मार्ग होता. नेपाळ आणि चीन दरम्यान व्यापारासाठीचाहा महत्त्वाचा रस्ता होता. आता हाच रस्ता बंद झाल्याने त्याचा दोन्ही देशातील व्यापारावर मोठा परिणाम होणार आहे.

हा रस्ता का महत्त्वाचा?

रासुवागढी नेपाळच्या रासुवा जिल्ह्यात आहे. हा रस्ता तिबेट सीमेच्या अत्यंत जवळ आहे. याच रस्त्यावर चीनची केरुंग सीमा चौकी आहे. दोन्ही देशात सामानांची नेआण करण्यासाठीचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग भोटे कोशी आणि त्रिशूली नदीच्या खोऱ्यातून जातो. या ठिकाणी मोठमोठाले डोंगर आहेत आणि निमूळत्या दऱ्या आहेत. याच परिसरात अनेक गाव, रस्ते, पूल आणि व्यापाराशी संबंधित सुविधा तयार झाल्या आहेत.

260 वर्ष जुना रस्ता

हा रस्ता भौगोलिक स्थितीत अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीसाठी हा रस्ता अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. हिमालय पार करण्यासाठी हा रस्ता अत्यंत सोपा मानला जात आहे. पण वेगाने येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर नद्यांच्या किनारी बनलेले रस्ते, पूल आणि वाहून जाण्याची शक्यता असते. शिवाय भूस्खलनानेही वाहून जाण्याची शक्यता असते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा रस्ता 260 वर्षाहून अधिक जुना आहे.

नेपाळ आणि तिबेटच्या दरम्यान व्यापारासाठी या रस्त्याचा वापर होत आहे. आधूनिक चेकनाके आणि स्टम व्यवस्था सुरू होण्याच्या आधीपासूनच हिमालयाच्या या परिसरातील अर्थव्यवस्था इथून होणाऱ्या व्यापारी मार्गावर अवलंबून होती. जुन्या काळातील व्यापारी याच रस्त्याने मीठ, लोकर, धान्य आणि इतर गरजेच्या वस्तू घेऊन जात होते. त्यामुळेच हा मार्ग नेपाळ आणि चीन, नेपाळ आणि तिबेट दरम्यानचा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता.

Follow Us
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर