AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळनंतर आता भारताच्या डोक्यावरही संकट? देशातील ‘त्या’ 5 सरोवरांनी वाढवली चिंता!

नेपाळमधील हिमनदी फुटून आलेल्या महापुरात ५३८ नागरिकांचा मृत्यू झाला असून, भारतातही हिमनदी सरोवरांचा धोका वाढला आहे. उत्तराखंडमधील पाच अतिसंवेदनशील हिमनदी सरोवरे, विशेषतः नेपाळ सीमेलगतची, चिंतेचा विषय बनली आहेत. हवामान बदलामुळे ही सरोवरे अधिक धोकादायक होत असून, केंद्राने राज्य सरकारांना त्यांच्या नियमित देखरेखीचे आदेश दिले आहेत.

नेपाळनंतर आता भारताच्या डोक्यावरही संकट? देशातील ‘त्या’ 5 सरोवरांनी वाढवली चिंता!
Nepal flash floodsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2026 | 5:10 PM
Share

नेपाळमधील महापुरात आतापर्यंत 538 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 1500 नागरिक बेपत्ता आहेत. तीन दिवस झाले तरी या बेपत्ता नागरिकांचा शोध लागलेला नाही. नेपाळमध्ये भारतातील 290 नागरिक गेलेले आहेत. त्यांचाही काही संपर्क झालेला नाही. तर कैलाश मानसरोवर यात्रेसाठी गेलेले 200 लोक तिबेटमध्ये फसलेले आहेत. मात्र ते सुरक्षित आहेत. नेपाळमध्ये ग्लेशियर फुटल्याने महापूर आल्याचं सांगितलं जात आहे. भारतातही अशाच प्रकारचे 5 ग्लेशियर सरोवर आहेत. हे ग्लेशियर सरोवर अति संवेदनशील आहेत. त्यामुळे जसं नेपाळवर काल संकट ओढवलं तसं भारताच्या डोक्यावरही संकट घोंघावत असल्याचं सांगितलं जात आहे.

देशातील अति संवेदनशील सरोवरांच्या यादीत उत्तराखंडातील 13 सरोवरांचा समावेश आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंध प्राधिकरण- एनडीएमएने वर्ष 2024मध्ये देशभरातील 200 ग्लेशियर सरोवरांची यादी जारी केली होती. यातील काही सरोवरांना संवेदनशील आणि काहींना अति संवेदनशील श्रेणीत ठेवलं होतं.

कुठे आहेत हे 5 ग्लेशियर सरोवर

अति संवेदनशील श्रेणीत असलेले हे पाच सरोवर उत्तराखंडमध्ये आहेत. यातील चार सरोवर नेपाळच्या सीमेपासून जवळच पिथौरागडमध्ये आहेत. तर एक वसुधारा ग्लेशियर सरोवर चमोलीमध्ये आहे. उत्तराखंडचे आपत्ती प्रतिबंधक आणि पुनर्वसन सचिव विनोद कुमार सुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व ग्लेशियर सरोवरांची नियमितपणे पाहणी करण्यात येत आहे. सध्या तरी चिंता करण्यासारखं काहीच नाही. प्राथमिक सर्वेक्षणाच्या आधारे सरोवरांची देखभाल आणि तिथे सुरक्षेच्या उपाय योजना मजबूत केल्या जाणार आहेत.

वातावरणाचा बदलता ट्रेंड

तज्ज्ञांच्या मते, वातावरणाच्या बदलत्या ट्रेंडमुळे देशभरातील ग्लेशियर सरोवर आपत्तीच्या कारणाने संवेदनशील होत आहे. भूस्खलन किंवा हिमस्खलनच्या कारणाने या सरोवरांचा फुटण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे महापूर येऊ शकतो. केंद्र सरकारने या सर्व गोष्टींची गंभीर दखल घेऊन सर्व राज्य सरकारांना ग्लेशियर सरोवरांवर विशेष निगराणी ठेवायला सांगितलं आहे. भविष्यात सुरक्षेचे उपाय मजबूत ठेवण्यासाठी हे आदेश केंद्राने दिले आहेत. याशिवया तीन सरोवरांचं सर्वेक्षणही करण्यात आलं आहे. चमोली आणि पिथौरागड येथील हे सरोवर असल्याची माहिती, विनोद कुमार सुमन यांनी दिली आहे.

Follow Us
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर