Video Viral : विदेशी महिला पाहून करू लागले मस्ती, ताजमहलच्या परिसरात विचित्र प्रकार; व्हिडीओ पाहून येईल संताप!

ताजमहालमध्ये एका विदेशी महिला पर्यटकाचं फोटोशूट सुरू असताना काही तरुण तिच्या आजूबाजूला उभे असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video Viral : विदेशी महिला पाहून करू लागले मस्ती, ताजमहलच्या परिसरात विचित्र प्रकार; व्हिडीओ पाहून येईल संताप!
taj mahal viral video
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2026 | 6:55 PM

भारताची संस्कृती, इथली ऐतिहासिक ठिकाणं आणि विविध परंपरा जगभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आल्या आहेत. त्यातही प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल पाहण्याची उत्सुकता अनेक विदेशी पर्यटकांमध्ये असते. पांढऱ्या संगमरवरी सौंदर्याने सजलेला ताजमहाल पाहण्यासाठी दरवर्षी देश- विदेशातून लाखो- करोडो पर्यटक आग्र्यात येत असतात.मात्र याच ताजमहालमध्ये एका विदेशी महिला पर्यटकासोबत घडलेली घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

ताजमहालमध्ये एका विदेशी महिला पर्यटकाचं फोटोशूट सुरू होत. तिथेच काही तरूण तिच्या आजूबाजूला उभे राहून तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होते. महिला पर्यटक संपूर्ण फोटोशूट करत असताना ते तरूण तिथेच उभे होते महिलेवर वाईट कमेंट्स करत होते. त्यामुळे महिला थोडी अस्वस्थ झाली होती. ही परिस्थिती पाहून फोटोग्राफरने त्या तरूणांना तिथून बाजूला होण्यास सांगितले. तरीही तरूण जागेवरून हललेही नाहीत.

 

 

परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे फोटोग्राफरने त्यांना थेट जाब विचारले तुम्ही इथे काय करत आहात? ताजमहाल पाहायला आला आहात तर ताजमहालच पाहा. अशा पद्धतीने एखाद्या स्त्रीकडे पाहत बसू नका. अशा शब्दात सुनावलं. त्यानंतर त्याने त्या तिथून दूर केले आणि निघून जाण्यास सांगितले.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच आपल्या भारतात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा आदर करण हे आपलं कर्तव्य आहे. एखाद्या विदेशी पर्यटक फोटो काढण्याला नकार देत असेल तर त्यासोबत फोटो काढण्याची जबरदस्ती करू नका. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत फोटोग्राफरने महिलेला साथ दिल्याने यूजर्सकडून फोटोग्राफरचे कौतुक होत आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us