Video | रागवलेल्या हत्तीने केळीची अख्खी बाग उद्ध्वस्त केली, फक्त एक झाड ठेवलं, कारण पाहाच

| Updated on: May 14, 2021 | 10:42 PM

जंगलात राहणाऱ्या इतर प्राणी आणि पक्ष्यांची हत्तीला काळजी असते, हे लोकांना क्वचितच माहिती असेल. (tamil nadu elephant destroyed all banana trees)

Video | रागवलेल्या हत्तीने केळीची अख्खी बाग उद्ध्वस्त केली, फक्त एक झाड ठेवलं, कारण पाहाच
Elephant
Follow us on

मुंबई : हत्ती प्राणी म्हटलं की आपल्याला त्याचे महाकाय शरीर आठवते. हत्तीच्या क्रुरतेचे अनेक किस्से आपण यापूर्वी अनेकदा ऐकलेले आहेत. मात्र, हत्ती हा अतिशय संवेदनशील असतो. त्यालासुद्धा भावना असतात. जंगलात राहणाऱ्या इतर प्राणी आणि पक्ष्यांची त्याला काळजी असते, हे क्वचित लोकांना माहिती असेल. मात्र, याची प्रचिती देणारी एक घटना सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेने हत्तीच्या संवेदनांचं दर्शन घडतंय. (Tamilnadu angry elephant destroyed all Banana trees only one kept behind with which was birds nests)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये एका गावात एका हत्तीने प्रचंड प्रमाणात नासधूस केली. या हत्तीने शेतातील केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या मदमस्त हत्तीने केळीची सर्व झाडं मुळापासून उखडून टाकली. तर काही झाडांना खोडापासून तोडून फेकलं. मात्र, या संपूर्ण बागेत त्याने फक्त एक केळीचे झाड तसेच ठेवले. या हत्तीने केळीच्या त्या झाडाला धक्कासुद्धा लावला नाही.

हत्तीने केळीच्या झाडाला धक्का का लावला नाही ?

या हत्तीने केळीच्या बागेतील सर्व झाडांची नासधूस केली. हत्तीच्या या रौद्र रुपामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर प्रशासनाने या शेतकऱ्याच्या नुकसानीची भरपाईसुद्धा करुन आली. मात्र, यातील उल्लेखनीय बाब म्हणजेच हत्तीने एका केळीच्या झाडाला थोडीसुद्धा इजा होऊ दिली नव्हती. त्याने त्या झाडाची नासधूस केली नाही. रागाने बेभान झालेल्या त्या हत्तीने असे का केले असावे ? असा प्रश्न तेथील शेतकऱ्यांना पडला होता. त्यानंतर या शेतकऱ्यांनी शाबूत असलेल्या झाडाकडे जाऊन त्याच्या आजूबाजूचे बारकाईने निरीक्षण केले. यावेळी त्यांना चकित करणारी गोष्ट सापडली. त्या केळीच्या झाडावर एका पक्ष्याने आपलं घरटं बांधलं होतं. त्या घरट्यात पिलं होती. ती पिलं नुकतीच जन्मली होती. या पिलांना कोणतीही इजा होऊ नये. जग पाहण्याआधीच त्यांचा अंत होऊ नये, म्हणून या हत्तीने घरटं असलेल्या केळीच्या झाडाला धक्कासुद्धा लावला नाही.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर त्याची दखल थेट आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी घेतली त्यांनी तामिळनाडूच्या स्थानिक वृत्तवाहीनीने केलेल्या वृत्तांकनाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. त्याला त्यांनी समर्पक कॅप्शनसुद्धा दिले. हा व्हिडीओ ज्या व्यक्तीने पोस्ट केला आहे, त्याचाल त्यांनी टॅगसुद्धा केलंय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी हत्तीच्या या संवेदनशीलतेचे तोंडभरून कौतूक केले आहे.

इतर बातम्या :

Viral Video : त्याने भल्या मोठ्या सापाला उचललं अन् थेट लुंगीत टाकलं; नंतर जे झालं ते एकदा बघाच

Viral Video : कोंबड्याच्या मुखातून थेट ‘अल्लाह-अल्लाह’, नेटकरी दंग, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | मित्राच्या पार्टीसाठी बालकनीत जमले, मध्येच घडला असा प्रकार की दोघे गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ

(Tamilnadu angry elephant destroyed all Banana trees only one kept behind with which was birds nests)