Temjen Imna Along यांचा एकदम ” Aww So Cute” वाटणारा फोटो, लोकं म्हणतात तुम्ही एका लहान बाळासारखे

हा फोटो पोस्ट करताना त्यांनी एक अतिशय मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. फोटोमध्ये त्याच्यासोबत आणखी एक व्यक्तीही दिसत आहे.

Temjen Imna Along यांचा एकदम  Aww So Cute वाटणारा फोटो, लोकं म्हणतात तुम्ही एका लहान बाळासारखे
Temjen Imna Along
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 17, 2022 | 5:36 PM

पुन्हा एकदा नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले. यावेळी त्याचा एक फोटो समोर आला, ज्यात त्याच्या हातात एक लहान मूल दिसत आहे. तेमजेन इम्ना अलॉन्ग सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. अनेकदा त्यांचे व्हायरल फोटो धुमाकूळ घालतात. यावेळीही असाच एक फोटो समोर आला आहे. या फोटोवर लोकं खूप कमेंट्स करतायत.

नागालँडचे उच्च शिक्षण आणि आदिवासी व्यवहार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तेमजेन इम्ना अलॉन्ग सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.

अनेक वेळा ते युजर्सच्या प्रश्नांना उत्तर देतानाही दिसतात. नुकतंच त्यांचा एक फोटो समोर आला होता, ज्यात ते एका लहान बाळासोबत दिसत आहेत.

हा फोटो पोस्ट करताना त्यांनी एक अतिशय मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. फोटोमध्ये त्याच्यासोबत आणखी एक व्यक्तीही दिसत आहे.

त्यांनी कॅप्शन लिहिले की, ‘घाबरू नका, फक्त सतर्क राहा कारण मुलांना काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. मुलाचे वडील माझ्या परिस्थितीवर हसत आहेत.”

दुसरीकडे या मंत्र्याची गोंडस प्रतिक्रियाही चित्रात पाहण्यासारखी आहे. ते त्या मुलाला अतिशय गोंडस पद्धतीने हाताळत आहेत.

“तुम्ही लहान मुलापेक्षा जास्त गोंडस आहात.” एखादं लहान मूल जेव्हा दुसऱ्या लहान मुलाला पकडते त्याप्रमाणे त्यांनी मुलाला पकडले आहे.

त्याचा हा फोटो खरंच अप्रतिम आहे. यावर अनेक युजर्स आपला फिडबॅक देत आहेत. एका युझरने लिहिले की, तुम्ही बाळापेक्षा जास्त क्यूट दिसत आहात. त्याचबरोबर काही युझर्सला ते कुणाचं मूल आहे हे समजलं नाही. हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.